तौक्ते वादळ! आता गुजरातकडे लक्ष, वायू दल सज्ज! 

तौक्ते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दल आणि एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 16.5 टन सामान आणि 167 कर्मचारी कोलकाताहून अहमदाबाद इथे पोहचले आहेत.

165

तौक्ते वादळाने अक्षरशः महाराष्ट्राच्या मुंबईसह कोकण किनारपट्टीत कहर सुरु केला आहे. आता हवामान खात्याने हे चक्री वादळ १७ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत  गुजरातच्या दिशेने रवाना होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वादळ पोहोचण्याआधीच गुजरातमध्ये वादळाचा सामना करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री पाठवली आहे. त्यासाठी सरकारने वायू दलाची मदत घेतली आहे. मोठ्या संख्येने बचाव करण्यासाठीचे साहित्य गुजरातमध्ये वादळ येण्याआधीच पोहचले आहे.

New Project 6 10

गुजरातमध्ये बचावकार्याची तयारी पूर्ण! 

या वादळाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाची तयारी झाली आहे. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दल आणि एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 16.5 टन सामान आणि 167 कर्मचारी कोलकाताहून अहमदाबाद इथे नेण्यासाठी 2 C-130J आणि 1 An-32 विमाने रविवारी, १६ मे रोजी तैनात केली होती.

SpokespersonMoD 1394251997252001795 20210517 165234 img1

ती विमाने आता अहमदाबादला पोहचली आहेत. त्याच बरोबर एनडीआरएफचे 121 जवानही गुजरातला पोहचले आहेत. तर 2 C-130J विमानेही एनडीआरएफचे 110  जवान आणि 15 टन सामान घेऊन पुण्याहून अहमदाबादला गेली आहेत.

New Project 8 8

(हेही वाचा : तौक्तेचे तांडव!)

मुंबईबाबत अंदाज चुकला?

दरम्यान मुंबईला ज्याप्रमाणात तौक्ते वादळाचा फटका बसला, त्याचा पूर्व अंदाज घेण्यास यंत्रणा अपयशी ठरली का, असा प्रश्न आता उद्भवत आहेत. ज्याप्रमाणात वादळामुळे मुंबईत पाऊस आणि वारा वाहू लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ठिकठिकाणी पाणी तुंबले, झाडे उन्मळून पडले. उपनगरीय रेल्वेच्या ओव्हरहेड वायर तुटून आगी लागल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुंबईत वादळाचा इतका फटका बसेल याचा अंदाज हवामान खात्याला आधीच का आला नव्हता, असा प्रश्न आता पडला आहे.

New Project 10 4

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.