पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रामनवमीच्या शोभायात्रेच्या तयारीवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही समाजकंटकांनी पूजा मंडप आणि मूर्तींना आग लावली आहे. रात्री २ नंतरची ही घटना आहे. तेथील पुजाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. गोबरडांगा पोलिस स्टेशन हद्दीतील बारगम कचरीबारी परिसरात ही घटना घडली आहे. (West Bengal)
हेही वाचा-Shri Ram Navami : श्री रामनवमीचे महत्त्व आणि माहिती जाणून घेऊया
अग्रदूत संघाकडून गेल्या ४० वर्षांपासून पूजा आयोजित केली जाते. सदस्यांना आणि शेजाऱ्यांना पंडालच्या मागे आग लागल्याचे दिसले. मूर्तींचा काही भाग जळलेला होता. एसडीपीओ हाब्रा आणि गोबरडांगा पोलिस स्टेशनच्या कार्यवाहक एसएचओ पिंकी घोष घटनास्थळी पोलीस फौजफाट्यासह आले होते. यानंतर स्थानिकांनी रस्ता रोखून निषेध व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात आग लावल्याने ती कोणी लावली आणि का लावली याचा शोध पोलीस घेत आहेत. (West Bengal)
हेही वाचा- Shri Ram Navami : हावडा येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला कोलकाता उच्च न्यायालयाकडून सशर्त परवानगी
रामनवमीनिमित्त मिरवणूक काढली जाणार आहे. या निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त लागणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे उंच इमारतींवर लक्ष ठेवले जात आहे. (West Bengal)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community