जम्मू-काश्मीरमधील (Terrorist Attack) डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात सुरक्षा दलांनी बुधवारी, (२६ जून) २ दहशतवाद्याला ठार केले. सकाळी या भागात २-३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती. त्यानंतर चकमक सुरू झाली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ११ आणि १२ जून रोजी डोडामध्ये दुहेरी दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस सखोल शोध मोहीम राबवत आहेत. आज सकाळी सिनू पंचायत गावात २-३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. दरम्यान, ढोकमधून (मातीचे घर) दहशतवाद्यांनी टीमवर गोळीबार केला.
(हेही वाचा – Metro Line 3 Junctionचं काम सुरू, पण कामगारांमध्ये भीतीचं वातावरण ! कारण काय ?)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ९.५० वाजता चकमक सुरू झाली. एका दहशतवाद्याने घरातून बाहेर येऊन हल्ला केला. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. सध्या चकमक सुरू आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे.
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, मंगळवारी सायंकाळी राजौरी जिल्ह्यातील चिंगुस भागातील पिंड गावातून एक चिनी ग्रेनेड जप्त करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community