Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये १ दहशतवादी ठार, लपलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून शोध सुरू

९ जूननंतर ४ दहशतवादी हल्ले झाले आहेत.

136
Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये १ दहशतवादी ठार, लपलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडू शोध सुरू

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सोमवारी, (१७ जून) सकाळी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. या परिसरात अजून २ ते ३ दहशतवादी लपल्याची शक्यता सुरक्षा दलाकडून व्यक्त होत असल्याने या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. (Terrorist Attack)

रविवारी, (१६ जून) अरगामच्या जंगलात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवली. सोमवारी सकाळी शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत एका दहशतवादी ठार झाला. या ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह जंगलात पडलेला ड्रोनमधून दिसला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटलेली नाही.

(हेही वाचा – Devendra Fadnavis: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपा सज्ज, कार्यकर्त्यांना सल्ला देताना फडणवीस म्हणाले… )

दहशतवाद्यांवर कठोर कारवाई…
१६ जून रोजीच गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेतली. ज्यात त्यांनी अधिकाऱ्यांना दहशतवादाचा मुकाबला करण्याचे निर्देश दिले आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.

४ ठिकाणी दहशतवादी हल्ले
९ जूननंतर ४ दहशतवादी हल्ले झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ९ जूनपासून रियासी, कठुआ आणि डोडा येथे ४ ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला. दरम्यान, १ नागरिक आणि ७ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.