श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला! दोन जवान हुतात्मा, १२ गंभीर जखमी

126

श्रीनगरमध्ये एका पोलिस बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्लात दोन जवान हुतात्मा झाले असून, अन्य १२ जवान गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ येथे सोमवारी,  सायंकाळी झाला. सशस्त्र पोलिस बटालियनच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी या बसवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केला गोळीबार

दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. त्यामुळे या हल्ल्यात पोलिस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलिस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

(हेही वाचा काशी दरबारी मोदींकडून शिवपराक्रमाचा उल्लेख, म्हणाले..)

पोलिस होते विनाशस्त्र, बसही बुलेटप्रूफ नव्हती

ज्या पोलिसांवर हल्ला झाला ती बस बुलेट प्रूफ नव्हती. बहुतांश पोलिस कर्मचाऱ्यांकडे त्यांचा बचाव करण्यासाठी बंदुका आणि इतर साहित्यही नव्हते. फार कमी पोलिसांकडे शस्त्रे होती. बस थांबवण्यासाठी दहशतवाद्यांनी टायरवर गोळीबार केला. यानंतर बसवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या हल्ल्यावेळी बसमध्ये एएसआई गुलाम हसन, कॉन्स्टेबल सज्जाद अहमद, कॉन्स्टेबल रमीज अहमद, कॉन्स्टेबल बिशम्भर दास, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल संजय कुमार, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल विकास शर्मा, कॉन्स्टेबल अब्दुल मजीद, कॉन्स्टेबल मुदस्सिर अहमद, कॉन्स्टेबल रविकांत, कॉन्स्टेबल शौकत अली, कॉन्स्टेबल अरशीद मोहम्मद, कॉन्स्टेबल शफीक अली, कॉन्स्टेबल सतवीर शर्मा, कॉन्स्टेबल आदिल अली, हे जवान होते. मात्र यात कोण हुतात्मा झाले, याची माहिती अद्याप मिळाली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.