Terrorist attack: छत्तीसगडमध्ये मतदानाच्या दिवशी चकमक, ३ जवान जखमी

पनवारजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डीआजी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

116
Terrorist attack: छत्तीसगडमध्ये मतदानाच्या दिवशी चकमक, ३ जवान जखमी
Terrorist attack: छत्तीसगडमध्ये मतदानाच्या दिवशी चकमक, ३ जवान जखमी

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी मतदान होत आहे. यादरम्यान सुकमा आणि कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. (Terrorist attack) या चकमकीत ३ जवान जखमी (jawans injured) झाले आहेत.

सुकमा येथे कोब्रा २०६ जवानांसोबत चकमक सुरू आहे. मीनपा येथील मतदान पार्टीला सुरक्षा देण्यासाठी जंगलातील सैनिक तैनात करण्यात आले होते. दरम्यान, येथे नक्षलवाद्यांशी चकमक सुरू झाली. या चकमकीबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘कांकेर जिल्ह्यातील बांदे पोलीस स्थानक परिसरात नक्षलवादी आणि बीएसएफ आणि डीआरजी टीममध्ये चकमक झाली. घटनास्थळावरून एके ४७ जप्त करण्यात आली आहे. परिसरात शोध सुरू आहे. काही नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याचीही शक्यता आहे. ‘

(हेही वाचा – Udhayanidhi Stalin : ‘मी सनातनला कायम विरोध करणार; माझी भूमिका बदलणार नाही; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतरही उदयनिधी स्टॅलिन ठाम )

कांकेर जिल्ह्यातील बांदे पोलीस स्थानक परिसरात बीएसएफ आणि डीआरजीची टीम मतदानासाठी परिसर तपासण्यासाठी निघाली होती. दरम्यान, पनवारजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डीआजी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. येथे सुरक्षा दलांनी काही नक्षलवाद्यांना ठार केले, मात्र संख्या अद्याप कळलेली नाही. घटनास्थळावरून एके ४७ जप्त करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.