Terrorist Attack: अकोल्यात हुतात्मा जवान प्रवीण जंजाळला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची उपस्थिती

193
Terrorist Attack: अकोल्यात हुतात्मा जवान प्रवीण जंजाळला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची उपस्थिती

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यात अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हा तरुण जवान हुतात्मा झाला. या जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधींसह स्थानिक ग्रामस्थ आजूबाजूच्या गावातील हजारो नागरिक उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिक अंत्यदर्शनासाठी दाखल झाले होते. यादरम्यान संपूर्ण मोरगाव आणि अकोला जिल्ह्यात शोकाकुल वातावरण पसरलं होतं. यावेळी अंत्यदर्शनासाठी हजारो संख्येने नागरिक उपस्थित झाले होते.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक झाली. अतिरेक्यांनी यावेळी सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांना ठार केले. २ वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. यात अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रविण जंजाळ या सैनिकाला वीरमरण आलंये. आपला मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान असल्याची भावना त्याच्या कुटूंबियांनी व्यक्त केली होती.

(हेही वाचा – जळगाव क्रीडा संकुलनाबाबत MLC Satyajeet Tambe यांची सरकारकडे विचारणा ) 

दरम्यान अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे हे मोरगाव भाकरे येथे हुतात्मा प्रविण जंजाळ यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. खासदार धोत्रे आणि वानखडेंकडून शहीद कुटूंबियांचं सांत्वन करण्यात आलं.

शहीद प्रवीण जंजाळ नेमके कोण?
2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. भरतीनंतर त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती, पण ४ महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत त्यांना कुलगाम जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालंय. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी शाममाला, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहेय. प्रवीण जंजाळ ४ महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. प्रवीण यांची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरलीये. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव इथं झालं होतं. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. विशेष म्हणजे प्रवीण यांनी घटनेच्या दिवशी म्हणजे काही वेळापूर्वी आपल्या वडिलांना घराच्या बांधकामसाठी 39 हजार रुपये पाठवले होते.

प्रवीण यांचे २ काकाही होते सैन्यदलात
प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हेदेखील सैन्यदलात होते. भास्करराव यांचे ४ वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.