Jammu and Kashmir मध्ये दहशतवादी हल्ले सुरुच; Doda मध्ये लष्करी तळावर केला गोळीबार

Jammu and Kashmir मध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्याच्या गोळीबारात एक स्थानिक व्यक्ती जखमी झाला. त्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल जोरदार गोळीबार करत एका दहशतवाद्याचा खात्मा केला.

195
Jammu and Kashmir मध्ये दहशतवादी हल्ले सुरुच; Doda मध्ये लष्करी तळावर केला गोळीबार
Jammu and Kashmir मध्ये दहशतवादी हल्ले सुरुच; Doda मध्ये लष्करी तळावर केला गोळीबार

जम्मू काश्मीरमध्ये रियासी आणि कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची घटना ताजी असतांनाच डोडा (Doda) जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या ऑपरेटिंग बेसवर (टीओबी) पुन्हा एकदा गोळीबार झाला. भारतीय सैन्याकडूनही दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला (Terrorist Attacks) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आली. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्याच्या गोळीबारात एक स्थानिक व्यक्ती जखमी झाला. त्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल जोरदार गोळीबार करत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांनी याबाबत मंगळवार, ११ जूनच्या रात्री उशीरा माहिती दिली.

(हेही वाचा – Porsche Accident Pune : किडनी तस्करीतही अडकलेला Dr. Ajay Taware)

भारतीय लष्कराकडून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. जम्मू-कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. भारतीय जवानाच्या प्रतिहल्ल्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. या हल्ल्याच्या काही तासांनंतरच डोडा येथील सैनिकांच्या बेसवर दहशतवद्यांनी हल्ला केला.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित

जम्मूचे एडीजीपी आनंद जैन याविषयी म्हणाले की, “दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. भारतीय जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. दहशतवाद्याच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दहशतवाद्याविरोधी ऑपरेशन अद्याप सुरु आहे, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर आहेत.”

दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. कधी नागरिक, तर कधी लष्कराच्या बेसवरच हल्ला केला जातोय. मागील तीन दिवसांत दहशतवाद्यांकडून तीन हल्ले करण्यात आले आहेत. रियासीमध्ये दहशतवाद्यांनी प्रवासी बसवर गोळीबार केला होता, यामध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला होता. लष्करांकडून जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्याविरोधात विशेष मोहिम राबवली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.