जम्मू- काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कठुआ जिल्ह्यातील बिलवार तहसीलमधील कोग-मंडली येथे दि. २९ सप्टेंबर रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीमध्ये एक दहशतवादी (terrorist) मारला गेला आहे. त्याचा मृतदेह सापडला असून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ही गोळीबार केला. यामध्ये हेड कॉन्स्टेबर बशीर अहमद (Bashir Ahmed) हुतात्मा झाले असून डीएसपी (DSP) आणि सहायक उपनिरिक्षक (ASI) जखमी झाले आहेत. दरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे.
( हेही वाचा : Islam : सावधान! इस्लाम राष्ट्रनिर्मिती आकार घेत आहे !)
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दि.२८ सप्टेंबर रोजी सुरक्षा दलाला तीन ते चार परदेशी दहशतवाद्यांची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरु केली होती. त्यादिवशी कुलगाम येथे दहशतवाद्यांशी (terrorist) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या गोळीबारात लष्कराचे चार जवान आणि कुलग्रामचे एएसपी जखमी झाले होते.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community