Terrorist Search Operation: काश्मिरातील उरीत दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरूच, अधिकाऱ्यांनी सांगितले…

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी १६ जून रोजी बैठक घेतली होती.

63
Terrorist Search Operation: काश्मिरातील उरीत दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरूच, अधिकाऱ्यांनी सांगितले...

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांना ठार केला. हे दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. उरीमधील गहलों भागात रविवारी, (२३ जून) दुसऱ्या दिवशीही सर्च ऑपरेशन सुरू आहे. येथे एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. (Terrorist Search Operation)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Terrorist Search Operation) सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक गट उरीच्या गोहलन भागात घुसखोरी करताना पाहिला. सुरक्षा दलांनी त्यांना थांबण्यास सांगितले आणि घुसखोरी हाणून पाडली. या भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसले आहेत. शनिवारी सायंकाळी हे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अधूनमधून गोळीबार झाला. यापूर्वी बुधवारी, १९ जून रोजी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील हदीपोरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये २ दहशतवादी मारले गेले होते आणि एक विशेष ऑपरेशन ग्रुपचा एक जवानदेखील जखमी झाला होता.

(हेही वाचा – निसर्गाचे विलोभनीय दृश्य पहायचे आहे ?; Chandoli National Park ला भेट द्या !)

दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न…
सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये २ दहशतवादी मारले गेले होते आणि एक विशेष ऑपरेशन ग्रुपचा एक जवान देखील जखमी झाला होता. जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी १६ जून रोजी बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दहशतवादाचा मुकाबला करण्याचे निर्देश दिले होते आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या बैठकीच्या अवघ्या ६ दिवसानंतर दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला.

रियासी हल्ल्यातील दहशतवाद्याच्या मदतनीसाला पोलिसांकडून अटक
१९ जून रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी ४५ वर्षीय ग्राउंड वर्कर हकीम-उद-दीनला रियासी येथून अटक केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी दहशतवाद्यांचा मोठा मदतनीस आहे. त्याने रियासी येथे भाविकांनी भरलेल्या बसवर हल्ला करण्यात दहशतवाद्यांना मदत केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.