बारामुल्ला (Baramulla) पोलिसांना दहशतवाद्यांबद्दल नवी माहिती मिळाली आहे. एका दुर्गम गावात जंगलाजवळील दुकानाचा दरवाजा रात्री दहशतवाद्यांनी तोडला. खाद्यपदार्थ आणि रेशनचे इतर साहित्य त्यांनी मोठ्या प्रमाणात लुटले. सामानापेक्षा जास्त रुपये ते डब्याखाली ठेवून गेले. दुकान लुटण्याची ही पंधरा दिवसांतील दुसरी घटना होती. किश्तवाडमधील (Kishtwar) चकमकीत रात्रभर दहशतवाद्यांनी केवळ ६ वेळा गोळीबार केला. सगळे पिन पॅाइंट निशाण्यावर होते. दहशतवाद्यांनी ६ फैऱ्यांतून संपूर्ण रात्र सुरक्षा दलास गुंगवले आणि ते सकाळी जंगलात गायब झाले. (Jammu and Kashmir )
या दोन घटना जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानातून घुसलेल्या दहशतवाद्यांच्या बदललेली रणनीती दर्शवणाऱ्या आहेत. एक म्हणजे स्थानिक दहशतवाद्यांची भरती केली जात नाही किंवा स्थानिक मदत देणारेही नेमले जात नाहीत. सगळ्या गोष्टी ते स्वत: करू लागले आहेत. दुसरे म्हणजे प्रशिक्षण, शस्त्रे, संवाद साधनेही उच्च पातळीवरील आहेत. विविध संस्थांच्या इनपुट आधारे जम्मू-काश्मीरमध्ये १२५ परदेशी दहशतवादी असल्याची माहिती आहे. अलीकडच्या वर्षांतील ही घुसखोरीची मोठी घटना आहे.(Jammu and Kashmir )
अमेरिकी सैन्यातील असॉल्ट रायफलचा वापर
काही दिवसांपूर्वी दहशतवादी एके रायफल बाळगत असत. मात्र आता त्यांना तालिबानकडून अमेरिकन सैन्यातील एम-४ कार्बाइन असॉल्ट रायफल (M-4 Carbine Assault Rifle) मिळाल्या आहेत. नाईट व्हिजन, रॉकेट लाँचर, आधुनिक शस्त्रेही आहेत. ड्रोननेही सीमेपलीकडून शस्त्रे पोहोचवतात. दहशतवादी कमी खर्च करून सुरक्षा दलांवर अचूक हल्ले करतात. त्यानंतर सहजपणे पळून जाण्यातही यशस्वी होतात. अशी माहिती मिळत आहे. (Jammu and Kashmir )
अॅपद्वारे रस्ते शोधणे
दहशतवादी स्थानिकांशी कमीत कमी संपर्क ठेवू लागलेत. रेशनसाठी दुकानांची लूट करतात. जंगलात सातत्याने लोकेशन बदलत आहेत. गिर्यारोहकांच्या अॅपद्वारे जंगलात मार्गांचा शोध घेतात. नजरेस पडू नये म्हणून दोन-चार अतिरेकी सोबत असतात. लोकांपासून अंतर अतिरेक्यांसाठी फायद्याचे ठरले आहे. (Jammu and Kashmir )
सुरक्षा दलाची मोठी समस्या
कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची मोठी धरपकड झाली होती. पोलिसांची गुन्हे प्रतिबंधक शाखा, आयबी, लष्करी गुप्तचर संस्था यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हेर पकडले गेले. त्यामुळे खबऱ्यांचे जाळेच संपुष्टात आले. त्यादरम्यान तांत्रिक व्यवस्थेद्वारे दहशतवाद्यांचे लोकेशन समजू लागले. २०२०-२१ मध्ये यातून ४०० हून जास्त दहशतवादी ठार झाले. नंतर खबऱ्यांना फारसे महत्त्व दिले गेले नव्हते. परिणामी दहशतवाद्यांच्या हालचाली, रेशन पुरवठा व अड्ड्यांची अचूक माहिती मिळवण्यात आता अडथळे निर्माण होत आहेत. (Jammu and Kashmir )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community