देश ज्यांच्या कायम ऋणात, वाचा ‘त्या’ वाघाची शौर्यगाथा

108

गलवान खोऱ्यात शेवटच्या श्वासापर्यंत चिनी सैनिकांशी लढणारे कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी हुतात्मा कर्नल संतोष यांच्या आई आणि पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला. चला, जाणून घेऊया हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांची शौर्यगाथा, ज्यांच्यापुढे देश आजही नतमस्तक आहे…

सरकार थक्क झाले

गेल्या वर्षी, 15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत बिहार रेजिमेंटने जबरदस्त धैर्य दाखवले होते. या चकमकीत हुतात्मा झालेल्या संतोष बाबूंबद्दल भारत सरकारने काही माहिती सार्वजनिक केली होती. चिनी सैन्याच्या हल्ल्याविरुद्ध भारतीय जवानांचे नेतृत्व करणारे कर्नल बी. संतोष बाबू यांच्या धाडसाची कहाणी ऐकून सरकार थक्क झाले.

हुतात्मा संतोष बाबूंची शौर्यगाथा 

ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान 16 बिहार रेजिमेंट गलवान व्हॅली (पूर्व लडाख) मध्ये तैनात करण्यात आली होती. शत्रूवर पाळत ठेवण्याचे काम या रेजिमेंटला दिले होते. 16 बिहार रेजिमेंटचे कर्नल बाबू यांनी संपूर्ण निष्ठेने जवानांना संघटित करून आणि ठोस नियोजनासह परिस्थितीची माहिती देऊन आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.संतोष बाबूंच्या रेजिमेंटला चीनच्या जोरदार आत्मघातकी हल्ल्याचा सामना करावा लागला, ज्यात दगडफेकीसह प्राणघातक आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. चिनी सैन्याच्या हिंसक आणि आक्रमक कारवाईला न घाबरता, कर्नल संतोष बाबू यांनी शत्रूच्या भारतीय सैन्याला मागे ढकलण्याच्या प्रयत्नांना प्रतिकार करणे सुरूच ठेवले.गंभीर जखमी झाल्यानंतरही, कर्नल संतोष बाबू यांनी शत्रूचा हल्ला रोखण्यासाठी अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थिती कर्नल संतोष बाबूंनी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूच्या हल्ल्याचा प्रतिकार केला.

चिनी सैनिकांना घ्यावी लागली माघार 

गंभीर जखमी झालेल्या 16 बिहार रेजिमेंटचे कर्नल बाबू यांनी प्रतिकूल परिस्थितीत नेतृत्व करत शत्रूचा सामना केला. भारतीय लष्कराने यापूर्वीच लडाखमध्ये ‘वीरोअर्स ऑफ गलवान’चे स्मारक बांधले आहे. या स्मारकात ऑपरेशन स्नो लेपर्डच्या पराक्रमी योद्ध्यांचा उल्लेख आहे ज्यांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले.

 (हेही वाचा: …तरच भारत क्रिकेट कसोटी क्रमवारीत अव्वल ठरू शकतो!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.