जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाणार; Kathua Terror Attack नंतर सरकारचा इशारा

198
जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाणार; Kathua Terror Attack नंतर सरकारचा इशारा
जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाणार; Kathua Terror Attack नंतर सरकारचा इशारा

जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात सोमवारी (८ जुलै) रोजी दुपारी दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात पाच लष्करी जवान हुतात्मा झाले आणि सहा जण जखमी झाले. ही घटना भारतीय लष्कराच्या ९ कॉर्प्सच्या हद्दीत घडली. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले, “जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला.” दरम्यान, या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. ‘आमच्या पाच जवानांच्या हत्येचा बदला घेणार आणि या दुष्ट शक्तींचा नाश करणार,’ असा इशारा संरक्षण सचिव गिरीधर अरमाने  (Defense Secretary Giridhar Armane) यांनी दिला. (Kathua Terror Attack)

(हेही वाचा – Radheshyam Mopalwar यांनी कमावली 3 हजार कोटींची माया; रोहित पवारांचा आरोप)

संरक्षण सचिवांनी म्हटले की, ‘कठुआ जिल्ह्यातील बडनोटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पाच शूर जवानांना वीरमरण आले. या सर्वोच्च बलिदानाबद्दल मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. त्यांनी देशासाठी केलेली निस्वार्थ सेवा सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल. भारत या हल्ल्यामागील दुष्ट शक्तींचा नक्की नाश करेल.’ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनीही जवानांच्या बलिदानाबद्दल एक्सच्या माध्यमातून तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. (Kathua Terror Attack)

(हेही वाचा – New Air Transport: आता करता येणार स्वस्तात विमान प्रवास, नवीन सेवा लवकरच सुरू; काय आहेत वैशिष्ट्ये ? जाणून घ्या…)

कठुआ हल्ल्यामागे कोण?

माध्यमांतील वृत्तानुसार, दुपारी ३.३० च्या सुमारास कठुआपासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहाई मल्हारमधील बदनोटा गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार मार्गावर नियमित गस्तीवर असलेल्या लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. ‘एनडीटीव्ही’नुसार लष्करी वाहनात १० जवान होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले; परंतु दहशतवादी शेजारच्या जंगलात लपले. अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये अधूनमधून चकमक सुरू असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.  (Kathua Terror Attack)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.