भारतीय सैन्याची ताकद वाढणार; 120 कामिकाझे ड्रोन सामील होणार

भारतीय सेनेची ताकद वाढवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. भारतीय लष्कर आता शक्तिशाली कामिकाझे ड्रोन विकत घेणार आहे. भारताने सीमा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी 120 कामिकाझे ड्रोन आणि 10 टार्गेटींग सिस्टिम खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. भारतीय लष्कराच्या अधिका-यांनी 4 नोव्हेंबर 2022 रोजी ही माहिती दिली. बाय इंडियन अंतर्गत फास्ट ट्रॅक प्रक्रियेद्वारे लाॅटरिंग सिस्टम आणि एरियल टार्गेटिंग सिस्टिम खरेदी केल्या जात आहेत.

सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी ड्रोनची खरेदी

भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, या खरेदीसाठी आरपीएफ लवकरच जारी केला जाईल आणि खरेदीच्या प्रस्तावांची माहिती दिली जाईल. अशा प्रकारच्या ड्रोनची खरेदी देशाच्या सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यास मदत करेल. तसेच, घुसखोरी रोखण्यास मदत करेल. ही ड्रोन यंत्रणा चीनच्या सीमेवर तैनात करुन भारतीय लष्कर आपली सीमा सुरक्षा वाढवू शकते.

काय आहेत कामिकाझे ड्रोन?

ही लहान मानवरहित विमाने आहेत, जी स्फोटकांनी भरलेली आहेत. ज्याने थेट शत्रूंच्या लष्करी तळांवर वापरली जाऊ शकतात. त्यांना स्विचब्लेड म्हणतात. कारण त्यांचे ब्लेडसारखे पंख प्रक्षेपणाच्या वेळी बाहेर निघतात. वाॅरहेड्सह त्याचे वजन सुमारे 5.5 पौंड आहे आणि ते 7 मैलांपर्यंत उडू शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here