आज भारतीय हवाई दलाचा 91 वा स्थापना दिवस आहे. (Indian Air Force Unveils New Flag) या निमित्ताने आज वायू दलाला नवा ध्वज मिळाला आहे. भारतीय हवाई दलाचे नवे पर्व चालू झाले आहे. ८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. 72 वर्षांनंतर वायू दलाच्या झेंड्यामध्ये बदल करण्यात आला आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल व्हीआर चौधरी यांनी परेड दरम्यान नवीन ध्वजाचे अनावरण केले. नवीन ध्वजावर उजव्या कोपर्यात भारतीय वायुसेनेचे चिन्ह असून त्यामध्ये त्यात हिमालयन गरुड आणि अशोक स्तंभाची भर पडली आहे. अशा नव्या रुपात आज भारतीय वायू दलाचा नवा ध्वज फडकवण्यात आला.
(हेही वाचा – Mumbai – Goa highway : सात तासांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत)
आरआयएएफ ध्वजामध्ये वरील डाव्या कँटनमध्ये यूनियन जॅक आणि फ्लाय साइडवर आरआयएएफ राउंडेल (लाल, पांढरा आणि निळा) याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र्यानंतर भारतीय वायुसेनेचा ध्वजामध्ये खालच्या उजव्या भागात यूनियन जॅकची जागा भारतीय तिरंग्याने घेतली आणि आरएएफ राउंडल्सएवजी तेथे तिरंग्याचे राउंडेल देण्यात आले. IAF crest हे राष्ट्रीय चिन्ह आहे, ज्याच्या शीर्षस्थानी अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली देवनागरीमध्ये “सत्यमेव जयते” लिहिलेले आहे. राष्ट्रीय चिन्हाच्या खाली एक गरुड आहे ज्याचे पंख पसरलेले आहेत, जे भारतीय वायुसेनेच्या लढाऊ गुणांचे प्रतिनिधित्व करतात. हिमालयीन गरुडाभोवती एक हलका निळा रिंग आहे ज्यावर “भारतीय वायुसेना” असे शब्द लिहिलेले आहेत. (Indian Air Force Unveils New Flag)
A momentous day in the annals of #IAFHistory.
On the sidelines of the Annual Air Force Day Parade conducted today morning, the CAS Air Chief Marshal VR Chaudhari unveiled the new #IAF ensign.
Read more at https://t.co/dUMkfkl0qV#AirForceDay2023#91stAnniversary… pic.twitter.com/UBVAJlBpgR— Indian Air Force (@IAF_MCC) October 8, 2023
भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य ” नभः स्पृशं दीप्तम्” हे देवनागरीमध्ये हिमालयीन गरुडाच्या खाली सुवर्ण अक्षरात कोरलेले आहे. IAF चे ब्रीदवाक्य भगवद्गीता अध्याय 11 श्लोक 24 वरून घेतले आहे आणि याचा अर्थ ” तू उज्ज्वल स्वर्गाला स्पर्श करशील” किंवा दुसर्या शब्दात “वैभवाने आकाशाला स्पर्श करा.” भारतीय वायुसेनेची मूल्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी आता एक नवीन ध्वज तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये आता झेंड्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात फ्लाय साइडवर एअर फोर्स लोगोचा समावेश आहे.
8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिन’ म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. वायुसेना दिनानिमित्त प्रयागराजमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. (Indian Air Force Unveils New Flag)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community