चीनच्या सैन्यात पाकिस्तानी अधिका-यांचा समावेश झाल्याने आता भारतीय सीमेला धोका निर्माण झाला आहे. चीन व पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांनी भारताविरुद्ध कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे सैन्य अधिकारी चीनच्या पीपल लिबरेशन आर्मी(पीएलए)च्या मुख्यालयात तैनात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे.
लडाखमध्ये अजूनही चिनी सैन्य तैनात
गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे संपर्क अधिकारी चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांड आणि दक्षिणी थिएटर कमांडच्या मुख्यालयात तैनात आहेत. चीनची पीपल लिबरेशन पार्टी, झिंजियांग आणि तिबेटच्या स्वायत्त प्रदेशासह भारताच्या सीमेचीही काळजी घेते. गेल्या महिन्यात चीनने जनरल वांग हायजियांग यांची वेस्टर्न थिएटर कमांडचे नवीन कमांडर म्हणून नियुक्ती केली होती. तसेच पीएलए दक्षिणी हाँगकाँग क्षेत्रांवर आणि मकाऊ या विशेष प्रशासकीय क्षेत्रांची देखरेख करते. चीन व भारतीय सैन्यात होणा-या सततच्या कुरघोडी आणि त्यानंतर झालेल्या चर्चासत्रांनंतरही मोठ्या संख्येने चिनी सैनिक पूर्व लडाख भागात तैनात आहेत.
(हेही वाचाः कोरोनानंतर चीनचा हा आहे नवा गेम…)
दोन्ही देशांच्या कुरघोडींवर भारताचं लक्ष
ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराचे कर्नल अधिकारी चीनच्या सैन्य आयोगाच्या संयुक्त कर्मचारी विभागात तैनात केले आहेत. हे पाकिस्तानचे लष्कर चीनच्या सशस्त्र दलात प्रशिक्षण घेत आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या 2016 च्या अहवालानुसार, पाकिस्तानने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर(सीपीईसी) आणि त्या कामाशी निगडित लोकांच्या सुरक्षेसाठी 9 हजार सैनिक आणि आपल्या निमलष्करी दलाच्या 6 हजार जवानांसह एक विशेष सुरक्षा विभाग स्थापन केला. चीन व पाकिस्तानच्या कुरघोडी परतवून लावण्यासाठी भारत या दोन्ही देशांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे.
Join Our WhatsApp Community