जम्मू -कश्मीरमध्ये दरीत कोसळून तीन जवान हुतात्मा; गस्त देताना अपघात

जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गस्त घालत असताना तीन जवान खोल दरीत पडले. या अपघातात तिन्ही जवान हुतात्मा झाले आहेत. माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) ही घटना घडली. हुतात्मा जवानांमध्ये एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा (जेसीओ) देखील समावेश आहे. सैनिक नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना ही घटना घडल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे. जेसीओ आणि इतर दोन रँक माछिल सेक्टरमध्ये नियमित गस्त घालत असताना तिघेही दरीत पडले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो बर्फाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीनगर-स्थित चिनार कॉर्प्सने एक निवेदन जारी करून सांगितले की, नियमित ऑपरेशन टास्क दरम्यान, ट्रॅकवर बर्फवृष्टीमुळे एक JCO आणि दोन ORs (इतर रँक) ची टीम खोल दरीत पडली. या अपघातात तिन्ही जवान हुतात्म् झाले. तिन्ही जवानांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

( हेही वाचा: हसन मुश्रीफांनंतर आता ‘या’ नेत्याने तयारीत राहावे; किरीट सोमय्यांचा इशारा )

यापूर्वीही घडल्या अशा घटना 

नोव्हेंबर महिन्यातही कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलनात तीन जवान हुतात्मा झाले होते. अल्मोडा चौकीजवळ हा अपघात झाला. येथे हिमस्खलनात ५६ आरआरचे तीन जवान हुतात्मा झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here