दोन Warship आणि एक Submarine राष्ट्राला समर्पित; पंतप्रधानांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण

82
२ Warships आणि १ Submarine राष्ट्राला समर्पित; पंतप्रधानांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण
२ Warships आणि १ Submarine राष्ट्राला समर्पित; पंतप्रधानांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये (Naval Dockyard) दोन प्रमुख युद्धनौका आणि एक पाणबुडी राष्ट्राला समर्पित केल्या. आयएनएस सूरत (INS Surat), आयएनएस नीलगिरी या युद्धनौका (Warship) आणि आयएनएस वाघशीर या आधुनिक पाणबुडीचे (Submarine) १५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत जलावतरण करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले.

(हेही वाचा – Ravichandran Ashwin Retirement : ‘केवळ शेवटची कसोटी म्हणून मला खेळवतायत असं नको होतं,’ – अश्विन)

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा दिवस भारताच्या सागरी वारशाचा आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा गौरव करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन दिशा आणि सामर्थ्य दिले. त्यांच्या पवित्र भूमीवर आपण २१व्या शतकातील नौदल बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत. आजच्या तीनही युद्धनौका (Warship) ‘मेड इन इंडिया’ आहेत, ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताची ओळख एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून होत आहे.”

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुढे म्हणाले की, “या नौका केवळ भारताच्या सागरी सुरक्षेला बळकटी देत नाहीत, तर भारताच्या औद्योगिक आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रालाही उभारी देतात. भारत नेहमीच खुले, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी प्रयत्नशील राहिला आहे. आम्ही विस्तारवादाला विरोध करत विकासाचा मार्ग स्वीकारला आहे. भारताने नेहमीच सुरक्षित, समृद्ध आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राला पाठिंबा दिला आहे. तटीय देशांच्या प्रगतीसाठी भारताने ‘SAGAR’ मंत्र दिला आहे, ज्याचा अर्थ ‘Security and Growth for All in the Region’ असा होतो, असे म्हणून पंतप्रधानांनी या नौकांच्या निर्माण प्रक्रियेत भारतीय अभियंत्यांनी घेतलेले कष्ट अधोरेखित केले.

मुंबईत आगमन झाल्यावर पंतप्रधानांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या वेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.

‘आयएनएस सुरत’ : जगातील सर्वांत मोठी युद्धनौका

‘आयएनएस सुरत’ हे पी१५बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज (Warship) आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक हे जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे.

‘आयएनएस निलगिरी’ : हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज (Warship) असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे. तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत.

‘आयएनएस वाघशीर’ : पी७५ स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौकांमुळे भारतीय नौदल अधिक सुसज्ज होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.