Tiger Death : भंडाऱ्यात वाघाचा बछडा मृतावस्थेत, दुसरा बछडा जिवंत ; वाघीण न दिसल्याने शिकारीचा संशय

45
Tiger Death : भंडाऱ्यात वाघाचा बछडा मृतावस्थेत, दुसरा बछडा जिवंत ; वाघीण न दिसल्याने शिकारीचा संशय
Tiger Death : भंडाऱ्यात वाघाचा बछडा मृतावस्थेत, दुसरा बछडा जिवंत ; वाघीण न दिसल्याने शिकारीचा संशय

या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात वाघांच्या मृत्यूंची (Tiger Death) मालिका सुरू झाली आहे. पहिल्या २२ दिवसांतच १४ वाघांचा मृत्यू झाला होता. जानेवारीच्या अखेरीस बहेलिया (Bahelia) शिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार (Tiger hunting) केल्याचेही उघडकीस आले होते. दरम्यान पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. (Tiger Death)

हेही वाचा-‘मोफत’ योजनांमुळे लोकांना काम नको; लाडकी बहीणसारख्या योजनांवर Supreme Court चं परखड मत

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लेंडेझरी वनक्षेत्रात (Lendezari forest area) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बावनथडी कॅनलला लागून असलेल्या शेतात ११ फेब्रुवारीला वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. त्याच्याजवळच दुसरा बछडा अत्यंत अशक्त अवस्थेत सापडला, मात्र त्यांची आई म्हणजेच वाघीण मात्र आजूबाजूला कुठेही दिसली नाही. (Tiger Death)

हेही वाचा-Pune News : पुणे शहरात ‘मिशन 17’ अंतर्गत आणखी 17 रस्ते होणार सुपरफास्ट

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृत बछड्याचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले, तर अशक्त बछड्याला पुढील उपचारांसाठी गोरेवाडा येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलवण्यात आले. दोन्ही मादी बछड्यांचे वय दोन ते तीन महिन्यांचे होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू झाला. (Tiger Death)

हेही वाचा-Illegal Entry : भारतात व्हिसा- पासपोर्टशिवाय अवैधरित्या प्रवेश केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाखांचा दंड

याशिवाय देवलापार येथेही वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत सापडले होते. टिपेश्वर अभयारण्यातही दोन बछडे एकटे फिरताना दिसत असून त्यांच्या आईचा कुठेही मागमूस नाही. या सर्व घटनांमुळे राज्यातील वाघांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. (Tiger Death)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.