भारतीय नौदलाचा ट्रोपेक्स-23, हा प्रमुख सागरी सराव सध्या हिंदी महासागर क्षेत्रात सुरू आहे. हा ऑपरेशनल लेव्हल, सराव दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो आणि यामध्ये भारतीय नौदलाच्या सर्व युनिट्स सह भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दलाचा ताफा देखील सहभागी होतो. ट्रोपेक्स 23, जानेवारी ते मार्च 23 या तीन महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या सरावाचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाच्या विनाशक, फ्रिगेट्स, कॉर्वेट्स तसेच पाणबुड्या आणि विमानांसह पृष्ठभागावरील सर्व लढाऊ यंत्रणेला जटिल सागरी कामगिरीवर तैनात केले जाते. नौदलाची युद्ध काळातील लॉजिस्टिक यंत्रणा आणि अन्य सेवांच्या समन्वयाने काम करण्याची क्षमता, यासह नौदलाच्या युद्ध सज्जतेच्या संकल्पनेचे प्रमाणीकरण करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. हा सराव वेगवेगळ्या टप्प्यात, बंदर आणि समुद्रामध्ये केला जात आहे. यामध्ये शस्त्रास्त्रांचा प्रत्यक्ष प्रयोग यासह युद्ध तंत्राच्या विविध पैलूंचा समावेश आहे.
वर्षानुवर्षे व्याप्ती आणि जटिलतेमध्ये वाढ झाल्यामुळे, हा सराव, भारतीय नौदलाच्या संयुक्त दलांच्या युद्ध सज्जतेची आणि विविध आघाड्यांवरील धोकादायक परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्याची संधी प्रदान करतो. सागरी सरावामुळे भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दल यांना आपापसात ऑपरेशनल पातळीवरचा संवाद साधायला मदत होते, ज्यामुळे गुंतागुंतीच्या परिस्थितीत एकमेकांबरोबर समन्वय साधून काम करण्याची त्यांची क्षमता आणखी मजबूत होते.
Join Our WhatsApp Community