लखनऊ मधून दोन आतंकवाद्यांना अटक! रचला होता मोठा कट

उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन आतंकवाद्यांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या आतंकवाद्यांकडून एक ऑटोमॅटिक शस्त्र मिळाले असून, कूकरमध्ये ठेवण्यात आलेला बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश एटीएसकडून अतिरिक्त तपास करण्यात येत आहे.

सापडला कूकरमध्ये बॉम्ब

लखनऊ येथे मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती मिळत आहे. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांचे काश्मीर कनेक्शन असल्याचा संशय असून, याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच कूकरमध्ये सापडलेला बॉम्ब हा प्रचंड विस्फोटक असल्याची माहिती मिळत आहे.

अशी झाली कारवाई

लखनऊ मधील काकोरी परिसरात हे दोन आतंकवादी लपले असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. एटीएस प्रमुख जी के गोस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या टीमने मिळालेल्या माहितीनुसार त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

असा होता कट

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत कूकरमधील बॉम्ब, एक डेटोनेटर आणि 6 ते 7 विस्फोटक जप्त करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लखनऊमधील एक भाजप खासदार आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधण्याचा आतंकवाद्यांचा डाव होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here