पोलिस चकमकीत दोन नक्षली ठार!

सर्चिंग ऑपरेशन सुरू असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सी 60 जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला.

91

गुरुवार, १३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा अंतर्गत पोलिस मदत केंद्र सावरगाव येथील मोरचूल-बोधनखेडा परिसरात सी 60 पोलिस जवान आणि नक्षवाद्यांची जोरदार चकमक घडून आली आहे. या चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे!

सी 60 जवानानी सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केले असून, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाल्याची माहिती आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा मोठा प्रमाणात पसरल्याने जखमी आणि मृतकांची संख्या जास्त असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सर्चिंग आपरेशननंतरच अधिक माहिती प्राप्त होईल. पोलिस सूत्रांनी अद्याप दुजोरा दिला नाही.

(हेही वाचा : गाझापट्टीवरून भारतात ‘ट्विटर वॉर’!)

तासभर चालली धुमश्चक्री!

धानोरा तालुक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सी 60 च्या जवानांनी सकाळी सातच्या सुमारास सर्चिंग ऑपरेशन सुरू केले. सर्चिंग ऑपरेशन सुरू असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सी 60 जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्याचवेळी सी 60 पोलिस जवानांनीही जशास तसे उत्तर दिले. जवळपास तासभर चाललेल्या धुमश्चक्रीत सी 60 जवानांचा वाढता दबाव पाहून जंगलाचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला. सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केले असता नक्षलवाद्यांचे दोन मृतदेह मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्चिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती पोलिस विभागाकडून देण्यात येणार असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.