अल-कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट (एक्यूआयएस) दोन दहशतवाद्यांना आसाम पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. अब्दुस शोभन अली आणि जलाल उद्दीन अशी दोघांची नावे आहेत. यांना आसामच्या गोलपारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
एक्यूआयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक
गोलपारा जिल्ह्याचे एसपी व्हीव्ही राकेश रेड्डी यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींचा दहशतवादी संघटनांशी थेट संबंध आहे. त्यांच्या घराची झडती घेतली असता ते अल-कायदाशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाले. यासोबतच जिहादी घटक, पोस्टर्स आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांचे मोबाईल फोन, सिमकार्ड आणि ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही संशयितांनी बांगलादेशातून आलेल्या जिहादी दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबरच त्यांना रेशन पुरवले होते, असे रेड्डी यांनी सांगितले. जिल्ह्यातील स्लीपर सेलच्या भरतीसाठी ते एक्यूआयएसचे सदस्य होते.
( हेही वाचा : MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही; उदय सामंतांचे स्पष्टीकरण )
यापूर्वी आसामच्या गोवालपारा जिल्ह्यातून तीन संशयित जिहादींना पकडण्यात आले होते. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. अब्दुस शोभन अली हा आयेशा सिद्दीका मदरशाचा इमाम असल्याचे सांगितले जाते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांशिवाय शोभन अलीचा मोठा भाऊ आणि पुतण्या यांचीही चौकशी सुरू आहे. सध्या त्यांची भूमिका आणि ते कोणत्या जिहादी गटाशी संबंधित आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Join Our WhatsApp Community