रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर जगभरात तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. दरम्यान आपल्याला मदत करण्याची मागणी युक्रेनने अनेक देशांकडे केली होती. परंतु युक्रेनकडे सगळ्या देशांनी व आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाठ फिरवली आहे.
आतापर्यंत युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अमेरिकेनं मात्र आता हात वर केले आहेत. अमेरिकेने युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर नाटो देशांनीही युक्रेनकडे पाठ फिरवली असून, बलाढ्य रशियापुढे युक्रेनचा एकाकी लढा सुरु आहे. त्यामुळे जगाच्या नकाशावर युक्रेन एकटा पडला आहे, हे स्पष्ट आहे.
केवळ निषेध
नाटो देश आणि अमेरिका रशियाने हल्ला केल्यावर युक्रेनमध्ये सैन्य पाठवतील अशी अपेक्षा होती. परंतु या प्रमुख देशांनी रशियाच्या कृत्याचा केवळ निषेध करत, गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाला दिला आहे. प्रत्यक्ष मात्र युद्धभूमीवर परिस्थितीला युक्रेन एकाकी लढा देत आहे.
( हेही वाचा : Russia Ukraine Conflict: नेमका वाद काय? भारतावर काय परिणाम होणार? )
युक्रेनचा एकाकी लढा
समाज माध्यमांवर नागरिक युक्रेनला पाठिंबा देत अमेरिका, नाटोच्या कृतीचा निषेध करत आहेत. ट्विटरवर युक्रेनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. युक्रेन सैनिकाच्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये तो त्याच्या पालकांना संदेश देताना दिसत आहे. त्याने म्हटले आहे की, “आई, बाबा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो,” हा सैनिक युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीबाबत सांगत आहे. तर युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना काही भागात एकत्रित आश्रय घेतलेले युक्रेनियन लोक आशादायक गाणी गात असलेला व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. बलाढ्य रशियाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी युक्रेनच्या सैन्यासह राष्ट्रपती व्होदिमर झेलंस्की स्वत: रणांगणात उतरले आहेत.
https://twitter.com/Fazilmir900/status/1497073519212908546
https://twitter.com/Fazilmir900/status/1496767102815932420
Join Our WhatsApp Community