रशियाने युक्रेनवर हल्ला करत युद्धाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आता जग तिस-या महायुद्धाच्या सावटाखाली आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. पण हा वाद नेमका काय आहे आणि या युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होणार, याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया.
युक्रेन रशियामधील नेमका वाद काय?
- युक्रेन हा आधी सोव्हिएत युनियन (USSR)चा भाग होता.1991 मध्ये जेव्हा USSR चे विभाजन झाले तेव्हा युक्रेन स्वतंत्र झाला.
- युक्रेनला NATOचे सभासद होऊन युरोपियन देशांप्रमाणे सार्वभौम राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करायची आहे.
- युक्रेन हा सोव्हिएत संघाचा भाग असल्यामुळे नाटोचा सभासद होऊन त्यावर पाश्चात्त्यांचं नियंत्रण पुतिन यांना नको आहे.
(हेही वाचाः #Worldwar3 रशिया-युक्रेनमध्ये ‘जंग’…नेटकऱ्यांना चढलाय भलताच ‘रंग’!)
NATO चे सदस्यत्वव मिळाल्यामुळे काय होतं?
- NATO(North Atlantic Traty Organisation)
- उत्तर अटलांटिक महासागराशी संलग्न असलेले 30 देश या संघटनेचे सदस्य आहेत.
- अमेरिका आणि युरोपियन संघातील देशांच्या नेतृत्वाखालील ही सुरक्षा संघटना आहे.
- या संघटनेच्या कुठल्याही सदस्य देशावरील हल्ला हा नाटो वरील हल्ला मानून संघटनेतील देश सदस्य देशाला लष्करी मदत करतात.
भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत भारताने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. रशियासोबत भारताचे संबंध हे फार जुने आहेत. भारत मोठ्या प्रमाणावर रशियातून लष्करी साहित्य आयात करत असतो. भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाच्या संरक्षण करारांवर स्वाक्ष-या झाल्या आहेत. त्यामुळे भारतासाठी रशिया आणि अमेरिका हे दोन्ही देश फार महत्वाचे आहेत. त्यामुळे या देशांशी वैर घेणं हे भारतासाठी योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः रशिया-युक्रेन युद्ध : कोणाचे किती आहे सामर्थ्य? जाणून घ्या…)
Join Our WhatsApp Community