भारतीय सैन्य दलावर ब्रिटिशांचा पगडा आहे, स्वातंत्र्यापासून ब्रिटिशांच्या गुलामीच्या पाऊलखुणा आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच नौदलाच्या बोध चिन्हांमध्ये बदल करून त्यामधून ब्रिटिशांच्या अस्तित्वाच्या खुणा काढून त्यामध्ये भारतीय संस्कृतीची चिन्हे घातली. आता मोदी सरकारने नौदलाचा Uniform बदलण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नौदलाच्या गणवेशात (Uniform) आता कुर्ता-पायजम्याचा समावेश होणार आहे. केंद्र सरकारने याचे निर्देश दिले आहेत. इंग्रजांच्या काळातील त्यांच्या गुलामगिरीची प्रतिके हळूहळू नष्ट केली जाणार आहेत. नौदलाने सर्व कमांडरना आदेश दिले आहेत की, मेस आणि इतर ठिकाणी वावरताना अधिकारी आणि जवानांनी कुर्ता-पायजमा (Uniform) घालावा.
New Dress Code in Officers Mess Implemented in #IndianNavy .
Soon #IndianArmy and #IndianAirForce too shall follow suit.
Jai Hind 🇮🇳 pic.twitter.com/Ud4ipFlDLt
— Brigadier Hardeep Singh Sohi,Shaurya Chakra (R) (@Hardisohi) February 13, 2024
(हेही वाचा : State Govt. Decision : शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय)
असा असेल गणवेश
स्लीव्हलेस जॅकेट, बुट किंवा सँडलसोबत कुर्ता पायजमा घालण्याची परवानगी दिली जावी असे केंद्राने म्हटले आहे. असे असले तरी गणवेशात (Uniform) कुर्ता-पायजमाचा रंग, कट आणि आकार याबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुर्त्याची लांबी फक्त गुडघ्यापर्यंत असावी. कमरपट्टा आणि साइड पॉकेट्स असलेला पायजमा असावा. ‘मॅचिंग पॉकेट स्क्वेअर’ स्लीव्हलेस आणि स्ट्रेट कट वास्कट असे जॅकेट घालता येईल. ब्लू आणि नेव्ही ब्ल्यू अशा दोन रंग संगतीत हा कुर्ता पायजमा असणार आहे. ‘कुर्ता-चुरीदार’ किंवा ‘कुर्ता-पलाझो’ घालू इच्छिणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठीही अशाच सूचना आहेत. हा नवीन ड्रेस कोड युद्धनौका किंवा पाणबुड्यांना लागू नाही. सप्टेंबरमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली होती. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीच्या मेसमध्ये पुरुष कर्मचारी तसेच पाहुण्यांसाठी कुर्ता-पायजमा यावर बंदी होती.
Join Our WhatsApp Community