अमेरिकेचा चीनला धक्का, तैवानची वाढवली ताकद

अमेरिका आणि चीन या दोन देशांतील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मधल्या काळात अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी या तैवानच्या भेटीला आले, तेव्हा तर चीनचा तीळपापड झाला होता. अमेरिकेने चीनला दबावात घेण्यासाठी तैवानची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पुष्टी देणारी घटना समोर आली आहे. अमेरिका तैवानला तब्बल १.१ बिलियन डॉलरची आधुनिक शस्त्रास्त्रे विकणार आहे.

आधुनिक शस्त्रास्त्रे विकणार 

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. यामध्ये अमेरिका तैवानला ६० अँटी-शिप मिसाइल आणि १०० एअर-टू-एअर मिसाइल देणार आहे. तसेच अमेरिका तैवानला साइडविंडर मिसाइल्सदेखील देणार आहे. याचा वापर हवेतून जमिनीवर केल्या जाणाऱ्या माऱ्यासाठी होतो. तैवान हा आपलाच प्रांत असल्याची चीनची भूमिका आहे. तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. दुसरीकडे अमेरिकेचे तैवानसोबत अधिकृतरित्या कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. चीनच्या वन पॉलिसीचे समर्थन तैवान करत आला आहे. पण अमेरिका -तैवान रिलेशन अॅक्ट अंतर्गत तैवानला शस्त्रास्त्र विक्री अमेरिका करत आला आहे. या कायद्यात अमेरिका तैवानला आत्मरक्षणासाठी मदत करेल असे नमूद आहे. यातच नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा चीनच्या पॉलिसीचे उल्लंघन असल्याची भूमिका चीनने घेतली होती. तरीही नॅन्सी यांनी तैवानचा दौरा केला. त्यावर संतप्त झालेल्या चीनने हा दौरा आम्हाला शस्त्र हाती घेण्यास भाग पाडणारा आहे, अशी उघड धमकीच दिली होती.

(हेही वाचा पाकिस्तानातील परिस्थिती भयावह; १२०० लोकांनी गमावला जीव)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here