US attack on Yemen: येमेनमधील हुती बंडखोरांवर अमेरिकेचा एअर स्ट्राइक ; २० जणांचा मृत्यू

64
US attack on Yemen: येमेनमधील हुती बंडखोरांवर अमेरिकेचा एअर स्ट्राइक ; २० जणांचा मृत्यू
US attack on Yemen: येमेनमधील हुती बंडखोरांवर अमेरिकेचा एअर स्ट्राइक ; २० जणांचा मृत्यू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी लाल समुद्रातील जहाजांवर झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. इराणचा (Iran) पाठिंबा असलेल्या येमेनमधील (Yemen ) हुथी बंडखोरांवर अमेरिकेकडून लष्करी कारवाई करण्यात आली. लष्कराने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये जवळपास २० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. (US attack on Yemen)

हेही वाचा-Free Sand : घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मिळणार मोफत; बावनकुळेंचा निर्णय

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेने केलेला हा पहिला हल्ला आहे. लाल समुद्रात हुती बंडखोर व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या आदेशावरून हा हल्ला करण्यात आला आहे. हुतीद्वारे संचलित आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यात 20 लोकांचा मृत्यू झाला असून नऊ जखमी झाल्याचे सांगितले आहे. येमेनची राजधानी सनावर हा हल्ला करण्यात आला आहे. हुतींनी हा हल्ला युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे हल्ले उत्तरी प्रांत सादापर्यंत सुरु होते असेही म्हटले आहे. आमचे लष्कर या हल्ल्यांचे प्रत्यूत्तर देण्यास समर्थ असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (US attack on Yemen)

हेही वाचा-Weather Update : कोल्हापूरच्या शाहुवाडीत मुसळधार पाऊस ; हवामानात होणार मोठे बदल, वाचा सविस्तर

ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, आमचे शूर सैनिक अमेरिकेच्या शिपिंग, हवाई दल आणि नौदलाच्या संपत्तीची रक्षा करण्यासाठी हवाई हल्ले करत आहेत. जहाजांची यातायात सुरक्षित वातावरणात व्हावी आणि दहशतवाद्यांच्या तळांना, त्यांच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी हे हल्ले केले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, जगातील कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकेच्या वाणिज्य आणि नौदलाच्या जहाजांचा जलमार्ग अडवू शकत नाही. (US attack on Yemen)

इराणला इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी यानिमित्ताने इराणलाही इशारा दिला आहे. या बंडखोरांना पाठिंबा देणे इराणने तात्काळ थांबवावे. इराण समर्थक असलेल्या हुथी बंडखोरांनी दशकभरापासून येमेनच्या अनेक भागांवर ताबा मिळविला असून ते इस्रायल आणि अमेरिकेचा विरोध करतात. इस्रायलने गाझामध्ये हल्ला केल्यानंतर हुथी बंडखोरांनी लाल समुद्र आणि एडनच्या आखातात अनेक जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. पॅलेस्टाईनवर होणाऱ्या इस्रायली हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदविला होता. (US attack on Yemen)

हल्ल्याला प्रत्त्युत्तर देणार
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांनीही निवेदन जाहिर केले आहे. या हल्ल्याला आमच्याकडूनही प्रतिसाद दिला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. अल-मसिराह वाहिनीवर बंडखोरांच्या राजकीय प्रवक्त्याने म्हटले की, अमेरिकेच्याया आक्रमकतेला आमच्याकडूनही योग्य उत्तर दिले जाईल. आमचे येमेनी सशस्त्र दलाचे सैनिक या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. (US attack on Yemen)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.