भारताने अमेरिकेकडून टेहाळणी विमान आणि अन्य संरक्षण साहित्य (Defense Materials) विकत घेतले आहे; पण मोदींच्या या दौऱ्यात अमेरिकेने भारताला F-35 देण्याची तयारी दाखवली आहे. (PM America Visit) F-35 हे सध्याच्या घडीला सर्वात घातक फायटर विमान आहे. F-35 हे पाचव्या पिढीत स्टेल्थ फायटर विमान (Stealth Fighter Aircraft) आहे. रडारला सुद्धा हे विमान सापडत नाही. अत्यंत अचूक वार करण्याची या लढाऊ विमानाची क्षमता आहे.
(हेही वाचा – सफाईचे कंत्राट बेरोजगारांना देण्याचे शासनाचे निर्देश; BMC ला Bombay High Court ने सुनावले खडे बोल)
मागच्या काही वर्षात आपण चीन-पाकिस्तानला लागून असलेल्या LOC वर दोन्ही देशांच्या कुरापतखोर, घुसखोरीचा अनुभव घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर असे शस्त्र आपल्याकडे असणे फायद्याचच आहे. पण त्यासाठी भारताला अब्जावधी रुपये मोजावे लागतील. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिकी दौरा खूप महत्त्वपूर्ण होता. व्यापार-संरक्षणाच्या दृष्टीने या दौऱ्याचे विशेष महत्त्व आहेच.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे अमेरिकी उद्योगांच्या संरक्षणासाठी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचा मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांना फटका बसला. भारताच्या बाबतीतही ट्रम्प असा निर्णय घेऊ शकतात ही धास्ती आहे. अलीकडे ट्रम्प यांनी जे निर्णय घेतले, त्याचा शेअर बाजारावर विपरित परिणाम झाल्याच दिसून आले.
शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. काही लाख कोटी रुपये बुडाले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा अमेरिका दौरा खास आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी ओवल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्या वेळी व्यापार-संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे करार झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारत रशिया, फ्रान्स आणि अमेरिका या तीन देशांकडून सर्वांत जास्त शस्त्रास्त्र खरेदी करतो. त्यात रशिया आणि फ्रान्स या दोन देशांशी भारताचे जुने संरक्षण संबंध आहेत. चीन पाकिस्तानला पाचव्या पिढीचे फायटर जेट देणार आहे. भारताला स्वत:ला पाचव्या पिढीचे फायटर विमान बनवायला अजून वेळ लागणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने F-35 देण्याची दाखवलेली तयारी मोठी बाब आहे. भारत आतापर्यंत फायटर विमाने फक्त रशिया आणि फ्रान्सकडून विकत घेत आला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “या वर्षी आम्ही भारताला काही अब्ज डॉलर्सची सैन्य साहित्य विक्री वाढवणार आहोत. आता आम्ही भारताला F-35 स्टेल्थ फायटर (F-35 Stealth Fighter) देण्याचा मार्ग सुद्धा प्रशस्त करत आहोत.” (PM America Visit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community