Houthi Attackers : जहाजांवर हल्ले करणाऱ्या हुथी बंडखोरांना अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा

260

सध्या लाल समुद्रावर (Red Sea) हुथी बंडखोरांकडून (Houthi Attackers) माल वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले करून ती लुटण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. ज्याचा थेट जगभरातील देशांच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे आता या विषयाकडे अमेरिकेने स्वतः लक्ष घातले आहे. या निमित्ताने अमेरिकेने बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

(हेही वाचा Cow Slaughtering : धर्मांध मुसलमानांची विकृती; गाभण गायीची केली हत्या; परिसरात संतापाची लाट)

या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अंत्रुत्वाखाली तब्बल १२ देशांनी येमेनच्या हुथी बंडखोरांना (Houthi Attackers) संयुक्तपणे इशारा दिला. जर त्यांनी लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ले थांबवले नाहीत, तर त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. आमचा संदेश आता स्पष्ट आहे. आम्ही हे बेकायदेशीर हल्ले त्वरित थांबवण्याची आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली जहाजे आणि क्रूची सुटका करण्याची मागणी करतो आहेत, असे व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले गेले आहे. हुथी बंडखोरांनी (Houthi Attackers) हल्ले सुरूच ठेवल्यास राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन बंडखोरांवर थेट हल्ला करण्याचा विचार करत असल्याच्या अनेक वृत्तानंतर हे विधान समोर आले आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ब्रिटनचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि जपान यांच्यासोबत सामील झालेल्या ब्रिटनने सोमवारी हुथी बंडखोरांविरुद्ध थेट कारवाई करण्याचा इशारा दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.