आर्यलंडची राजधानी डब्लिनमध्ये (Dublin Violence) सध्या हिंसाचार उसळला आहे. आयरिश दंगलखोरांनी डब्लिनमधील हॉलिडे इन एक्स्प्रेस हॉटेलला आग लावली आहे. या हॉटेलमध्ये आश्रय घेणाऱ्यांना राहण्यासाठी सरकार हॉटेलचा वापर करत आहे. शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
येथील अल्जेरियाच्या एका व्यक्तिने शाळेजवळ केलेल्या चाकूहल्ल्यात जखमी झालेली महिला (३०) मुलीवर(५) चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो मुलगी गंभीर जखमी झाला. जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात शस्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी जखमींना सेंटर सिटी रुग्णालयात दाखल केले आहे. दंगलखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेकडो पोलीस तैनात आहेत.
या हल्ल्यात नागरिकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यानंतर संपत्त जमावाने गाड्या, बस आणि ट्रेनही पेटवून दिली. याशिवाय दुकानेही जाळण्यात आली. या घटनेबाबत न्यायमंत्री हेलन मॅकएंटी यांनी सांगितले की, या हल्ल्याचा वापर करून हिंसाचार माजवला जात आहे. आयरिश पोलीस प्रमुख गार्डा कमिशनर ड्र्यू हॅरिस यांनी अशांततेसाठी उजव्या विचारसरणीने प्रेरित लोकांना जबाबदार धरले आहे.
🅱🆁🅴🅰🅺🅸🅽🅶 🅽🅴🆆🆂 🇮🇪 Heartbreaking scenes in Dublin as citizens react to a morning terror attack. A young girl lost her life, and several children were injured. Let’s stand together against senseless violence. No borders can shield us from the impact of such tragedies. 💔… pic.twitter.com/74DI2evGmD
— Asaf Givoli (@AsafGivoli) November 23, 2023
या प्रचंड हिंसाचारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंदोलकांनी पोलिसांवर फटाके आणि कचरा फेकला आणि तो पेटवून दिला याशिवाय लोकांनी पोलिसांच्या गाड्या, बस आणि ट्रेनसह वाहनांनाही आग लावली. दुकानांचे नुकसान केले. शहरातील मध्यवर्ती डिपार्टमेंटल स्टोअर्स लुटले.
आयरिश मिडियाने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर परदेशी असल्याच्या अफवांमुळे दंगल उसळली, मात्र त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दंगलखोर जमावाकडून एक बस जाळण्यात आली. परदेशी लोकांना देशाबाहेर पाठवावे, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. दंगलखोरांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्या, लोखंडी रॉडने दुकानांच्या काचा फोडल्या.
आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर या हिंसाचाराबाबत म्हणाले की, या चाकू हल्ल्याने देश हादरला आहे. या घटनेची निंदा करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत. आयरिश राष्ट्राध्यक्ष मायकेल हिगिन्स यांनीही एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही या भीषण हल्ल्यात जखमी झालेल्या प्रत्येक बालक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community