Nepal मध्ये हिंसक निदर्शने ! 105 निदर्शकांना अटक, सीमेवर हाय अलर्ट

81
Nepal मध्ये हिंसक निदर्शने ! 105 निदर्शकांना अटक, सीमेवर हाय अलर्ट
Nepal मध्ये हिंसक निदर्शने ! 105 निदर्शकांना अटक, सीमेवर हाय अलर्ट

नेपाळमध्ये (Nepal) झालेल्या हिंसक निदर्शनांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार भडकवणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे आणि जाळपोळ करणे या आरोपाखाली पोलिसांनी १०५ जणांना अटक केली आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे उपाध्यक्ष रवींद्र मिश्रा, सरचिटणीस धवल शमशेर राणा यांचा समावेश आहे. याशिवाय स्वागत नेपाळ, शेफर्ड लिंबू आणि संतोष तमांग यांसारख्या राजेशाहीचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांसह १७ इतर नेत्यांचाही समावेश आहे. (Nepal)

निषेधाचे मुख्य आयोजक नवराज सुबेदी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, या निदर्शनाचे मुख्य कमांडर दुर्गा परसाई यांचा शोध घेतला जात आहे. अधिक नेपाळी संघटनांच्या निदर्शकांनी काठमांडूतील टिनकुने येथील एका इमारतीची तोडफोड केली आणि ती पेटवून दिली. निदर्शकांनी पोलिसांवरही दगडफेक केली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. (Nepal)

या धुमश्चक्रीत एक निदर्शक व एका पत्रकाराचा मृत्यू झाला. प्रशासनाने काठमांडूत संचारबंदी लागू केली. लष्कर तैनात केले. निदर्शकांनी ‘राजा आओ, देश बचाओ, ‘भ्रष्ट सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. दुसरीकडे समाजवादी मोर्चाने भृकुटीमंडप येथे विरोधात आंदोलन केले. (Nepal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.