ब्लादिमीर पुतीन आणि अजित डोभाल यांची भेट; अफगाणिस्तानवर चर्चा

163

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी मंगळवारी, ६ फेब्रुवारी रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्यामध्ये भारत-रशिया सामरिक भागीदारी आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. मॉस्कोस्थित भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. अजित डोभाल अफगाणिस्तानवर बहुपक्षीय सुरक्षेच्या मुद्यावरील बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्को दौऱ्यावर गेले. यावेळी भारत-रशिया रणनीतीक भागीदारी लागू करण्याच्या दिशेने काम सुरू ठेवण्यावर एकमत झाले.

अफगाणच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही

अफगाणिस्तानवरील सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या पाचव्या बैठकीत NSA डोभाल म्हणाले, अफगाणिस्तान सध्या कठीण स्थितीतून मार्गक्रमण करत आहे. भारत या संकटाच्या काळात अफगाणच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. भारताने अफगाणिस्तानला 40,000 मेट्रिक टन गहू, 60 टन औषधे, 5 लाख कोविड लस पाठवून संकटकाळात मदत केली आहे. अफगाणी जनतेचे कल्याण आणि मानवीय गरजा पूर्ण करण्यास भारताचे प्राधान्य आहे. दहशतवाद सर्वात मोठा धोका बनला आहे. कोणत्याही देशाने अफगाणिस्तानच्या मार्गे दहशतवाद पसरू नये असे आम्हाला वाटते. अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद व दाएश सारख्या अतिरेकी संघटनांचा निपटारा करण्यासाठी सदस्य देशांत गुप्तहेर आणि सुरक्षा सहकार्य असणे आवश्यक आहे. 6 महिन्यांपूर्वी रशियन NSAला भेटले होते. अजित डोभाल यांनी ऑगस्ट महिन्यात रशियाचे सुरक्षा सल्लागार निकोलाई पत्रुशेव यांची भेट घेतली होती. यावेळी अफगाणिस्तान, दहशतवाद आणि रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली होती.

(हेही वाचा पंतप्रधानांचे ‘ते’ वक्तव्य खोटे ठरवण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न; FACT CHECK मधून पर्दाफाश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.