गैर काश्मिरींना मतदानाचा अधिकार दिल्याने दहशतवादी संघटनांचा हल्ले तीव्र करण्याचा इशारा

82

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35ए हटवल्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये इतर राज्यातील मतदारांनाही मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर मधील मतदारांची संख्या वाढणार आहे. पण यामुळे दहशतवादी संघटनांचा पोटशूळ उठला असून, लष्कर-ए-तोयबा समर्थित एका दहशतवादी संघटनेने गैर काश्मिरी नागरिकांवरील हल्ले वाढण्याचा इशारा दिला आहे. एका वेबसाईटच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे.

दहशतवादी संघटनेची धमकी

दहशतवादी ग्रुप काश्मीर फाईटने ही धमकी दिली आहे. जेव्हा जिंकण्याचे कारण मोठे असते तेव्हा अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात. गैर काश्मिरी नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रकार आमच्यापैकी कुणालाही रुचलेला नाही. मात्र हे सत्य असून दिल्लीकडून हा घाणेरडा खेळ खेळण्यात येत आहे. त्यामुळे हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढवणे अधिक गरजेचे आहे, अशी पोस्ट एका दहशतवादी पोस्टच्या माध्यमातून काश्मीर फाईटकडून करण्यात आली आहे.

(हेही वाचाः जम्मू-काश्मीरमध्ये 25 लाख नवे मतदार, काय आहे कारण?)

या व्यक्तींना लक्ष्य करण्याची धमकी

या पोस्टमध्ये कोणकोणत्या व्यक्तींना लक्ष्य करण्यात येईल याची माहिती देखील देण्यात आली आहे. प्रत्येक परप्रांतीय नागरिकाला हे हल्ले सहन करावे लागतील. सरकारी कर्मचारी,व्यावसायिक,मजूर,पर्यटक,जम्मू-काश्मीर पोलिस,निमलष्करी दले,माहिती देणारा स्थानिक नागरिक यांना यामध्ये लक्ष्य करण्यात येईल, असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच गैर काश्मिरी नागरिकांची घरे देखील जाळून उद्ध्वस्त करण्यात येतील, असाही इशारा या पोस्टच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.