भारत हिंद महासागरात आतापर्यंतचा सर्वांत मोठा वॉर गेम आयोजित करत आहे. यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण कोरियासह 50 देशांच्या नौदलांचा समावेश असेल. 20 देश युद्धनौकांसह सहभागी होत आहेत. सागरी क्षेत्रात चीनकडून सातत्याने चालू असलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर हे आयोजन करण्यात येत आहे. (War Games in Arabian Sea)
ड्रोन हल्ल्यांपासून बचावाचा सराव करणार
अरबी समुद्रातील व्यापारी मार्गांवर अलीकडच्या काळात झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे जगाची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा सराव घेतला जात आहे. मिलन सरावामध्ये नौदल ड्रोन हल्ल्यांपासून बचावाचा सराव करणार आहे आणि चाचेगिरीच्या विरोधात नौदल ऑपरेशन्सची रचनादेखील करतील.
आतापर्यंतचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव असेल. भारतीय नौदल आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतसह किमान 30 युद्धनौका या सरावासाठी तैनात करणार आहे. चीन आता सागरी मार्गाने श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीवमध्ये आपली पकड मजबूत करण्यात व्यग्र आहे. (War Games in Arabian Sea)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community