
वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) हिंसक आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोक हिंसाचारग्रस्त भागातील आपले घर सोडत आहेत. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, उत्तर २४ परगणा, हुगळी आणि मालदा जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात हिंसक निदर्शने झाली. वाहने जाळण्यात आली, दुकाने आणि घरांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ पोलिस जखमी झाले आहेत. १५० जणांना अटक करण्यात आली आहे. (West Bengal)
भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले की, बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यांना अफस्पा कायद्यानुसार अशांत क्षेत्र जाहीर केले पाहिजे. महतो यांनी बंगालमध्ये हिंदूंच्या पलायनाच्या सध्याच्या स्थितीची तुलना १९९० मध्ये काश्मीर पंडितांच्या पलायनाशी केली. भाजप नेते प्रदीप भंडारी यांनी सीएम ममता बॅनर्जींवर राज्यात हिंदूंविरुद्ध हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप केला. (West Bengal)
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर रविवारी पोलिस व केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांनी धूलियान, शमशेरगंज आणि सुती क्षेत्रात गस्त सुरू केली. यामुळे सर्व रस्ते सुनसान होते, दुकाने बंद होती. लोक घरांत राहिले. केंद्र सरकारने हिंसाचारग्रस्त भागात १६०० सैनिक तैनात केले आहेत. यामध्ये ३०० बीएसएफ सैनिक आहेत. एकूण २१ दल तैनात करण्यात आले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेटवर बंदी आहे. BNS चे कलम १६३ देखील लागू आहे. राज्यात वक्फ कायदा लागू होणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. (West Bengal)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community