कोरोना महामारीत नौदलाची मदत!

आयएनएचएस जिवंती, गोवा, आयएनएचएस पतंजली, कारवार आणि आयएनएचएस संधनी, मुंबई या पश्चिमी नौदलाच्या तिन्ही रुग्णालयांत नागरीक्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडची सुविधा उभारण्यात आली आहे.

84

सध्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, रुग्णसंख्या वाढत आहे आणि आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे आता देशाच्या पश्चिमी भागातील नौदल नागरीसेवेसाठी धावून आले आहे. यात नागरी क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय व्यवस्था, त्यात ऑक्सिजन बेड इत्यादी सुविधा पश्चिमी नौदलाच्या तीन रुग्णालयांमध्ये उभारण्यात आली आहे.

पश्चिमी नौदलाचे तिन्ही रुग्णालये नागरी सेवेसाठी सज्ज!

आयएनएचएस जिवंती, गोवा, आयएनएचएस पतंजली, कारवार आणि आयएनएचएस संधनी, मुंबई या तीन रुग्णालयांमध्ये नागरिकांसाठी ऑक्सिजन बेडची सुविधा उभारण्यात आली आहे. मुंबईत लॉकडाऊनच्या काळात बेघर आणि उपासमारीला सामोरे जावे लागत असलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी नौदलाच्या परिसरातच निवासस्थान उभारण्यात आले आहे. तर कारवार येथेही १५०० परप्रांतीय मजुरांना अत्यावश्यक सुविधा, रेशन आणि प्राथमिक गरजा भागविणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. आयएनएचएस पतंजली येथे प्रथमच कोरोनाबाधित नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. नौदलाने गोवा येथे कम्युनिटी किचनची सुविधा उभी केली आहे. तसेच कोरोना बाधित भागात वैद्यकीय साधनसामुग्री, औषधे यांची वाहतूक करण्यास साहाय्य केले जात आहे.

New Project 4 20

आयएनएचएस अश्विनीत वैद्यकीय पथक तयार!

सध्या नौदलाच्या रुग्णालयांमध्ये नौदल कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी लसीकरण राबवले जात आहे. १ मे पासून या ठिकाणी १८ वर्षांच्या पुढील वयोगटातील घटकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आयएनएचएस अश्विनी मुंबई येथे वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. देशातील कोणत्याही भागात कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यकता असेल तिथे हे पथक अल्पावधीत हजर होईल. यात नर्ससह वैद्यकीय आणि विनावैद्यकीय क्षेत्रातील अनेकांना या महामारीत सेवा देण्यासंबंधी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

(हेही वाचा : अखेर लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला! ‘हिंदुस्थान पोस्ट’चे वृत्त खरे ठरले!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.