…म्हणून झालं सीडीएस बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, चौकशीतून माहिती उघड

97

चीफ ऑफ डिफेन्स, जनरल बिपीन रावत हे बुधवारी, 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूत दौ-यावर होते. ते पत्नीसह लष्करी अधिका-यांसह हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. यामध्ये देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांना देशाने गमावले. या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासासंदर्भातील मोठा खुलासा समोर आला आहे.

गठित केलेल्या समितीच्या चौकशीतून उघड

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे या गठित केलेल्या समितीच्या चौकशीतून समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीने आपली चौकोशी पूर्ण केली असून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. वायुसेनेकडून अहवालाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीने अहवालात म्हटले की, खराब हवामानामुळे वैमानिक विचलित झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे हा अपघात झाला असावा.

(हेही वाचा – कोण आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत? जाणून घ्या…)

अतिशय सुरक्षित समजले जाणारं दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. असे सांगितले जाते की, हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं असून सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर प्रामुख्याने वापरले जाते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.