मिराज, सुखोई लढाऊ विमाने एकमेकांना धडकली; अपघात होण्यामागे काय आहेत कारणे?

130

शनिवारी, २८ जानेवारी रोजी हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराज- 2000 हवेत एकमेकांना धडकून कोसळली. हा अपघात इतका तीव्र होत की, अपघातानंतर दोन्ही विमानांचे अवशेष तब्बल ९० किलोमीटर दूरवर खाली पडले. प्रशस्त आकाशातविमाने एकमेकांना धडकतातच कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्याची उत्तरे तज्ज्ञांनी दिली आहेत. या दुर्घटनेबाबत हवाई दलाने सांगितले की, ग्वाल्हेरजवळ ही विमाने नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होती. यात सहभागी असलेल्या तीन वैमानिकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातामागील कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघात मानवी चुकीमुळे? 

  • संरक्षण तज्ज्ञ प्रफुल्ल बक्षी यांच्या मते, हवेत दोन विमाने एकमेकांना धडकण्यामागे दोन कारणे आहेत. एक हवाई वाहतूक नियंत्रणातील त्रुटींमुळे अपघात होऊ शकतो, किंवा वैमानिकाच्या चुकीमुळे अपघात होऊ शकतो. अशा दुर्घटनेमध्ये मुख्यतः मानवी चूक अधिक कारण असू शकते. हे कारण असू शकते. दोन्ही विमाने जर एकाच ठिकाणी कोसळली, तर ती एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला असेल, असे म्हणता येऊ शकते, जर विमाने एकाच ठिकाणी धडकली असतील तर ती वेगवेगळ्या ठिकाणी पडतील असे होऊ शकत नाही. सरावाच्या वेळी दोन्ही विमानांनी ग्वाल्हेरहून उड्डाण केले असेल आणि पुन्हा ग्वाल्हेरमध्येच उतरत असतील. यावेळी एटीसीशी संपर्क तुटल्याने एकमेकांना बघू शकले नाही आणि एकमेकांना धडकले, असेही बक्षी म्हणाले.
  • तर हवाई दलाचे निवृत्त पीआरओ अनुपम बॅनर्जी यांच्या मते, अपघाताचे कारण सांगणे आता घाईचे ठरेल. मात्र, हे खरे आहे की, जेव्हा दोन विमाने एका विशिष्ट भागात धडकतात तेव्हा मानवी चुकांची शक्यता जास्त असते. वैमानिकाच्या निर्णयामुळे किंवा एअर कंट्रोलमधील समस्येमुळे अशी घटना घडण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा आता मुंबईत BBC Documentary चे स्क्रिनिंग; भाजपने थोपटले दंड)

अपघातात सुखोई विमानातील वैमानिक वाचले कसे? 

या अपघातात सुखोई -३० लढाऊ विमानातील २ वैमानिक वाचले आहेत, मात्र मिराज-२००० मधील वैमानिक ठार झाला आहे. इतक्या उंचावर दोन विमाने एकमेकांना धडकली तरी त्यातील सुखोई विमानातील वैमानिक वाचले कसे असा प्रश्न पडला आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, सुखोई विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुपपणे विमानाबाहेर पडण्यात यशस्वी झाले. अपघातावेळी रॉकेट पॉवर सिस्टम पायलटला विमानाबाहेर काढण्यात मदत करते. लढाऊ विमानाच्या अपघाताच्या वेळी त्याची स्थिती, यंत्रणा व वेळ यावर सर्वकाही अवलंबून असते. क्रॅशच्या वेळी पायलटकडे काही मोजक्याच सेकंदांचा वेळ असतो. लढाऊ विमान क्रॅश झाल्यावर वैमानिकांना बाहेर काढण्यासाठी रॉकेट पॉवर सिस्टम सर्वात जास्त मदत करते. याला इजेक्शन सीट म्हणतात. रॉकेट पॉवर सिस्टम पायलटच्या सीटखाली असते. अपघाताच्या वेळी पायलट ते सक्रिय करतो. यंत्रणा कार्यान्वित होताच, विमानाचा एक छोटासा भाग उघडतो आणि पायलट पॅराशूटच्या मदतीने खाली उतरून सुरक्षित लँडिंग करतो. पण अनेकदा अपघातात पायलटची सीट डॅमेज झाली तर पायलटसमोरील धोका वाढतो. या स्थितीत क्रॅशच्या वेळी रॉकेट पॉवर सिस्टम काम करत नाही. अशा प्रसंगी वैमानिकाला आपले प्राण गमवावे लागतात.

काय वैशिष्ट्ये आहेत मिराज – २०००ची?

हे भारतीय हवाई दलातील सर्वोत्तम आणि घातक लढाऊ विमानांपैकी एक आहे. मिराज-2000 हे फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवले आहे. त्याने 1978 मध्ये पहिले उड्डाण केले होते आणि 1984 मध्ये फ्रेंच हवाई दलात सामील झाले. 1985 मध्ये मिरज पहिल्यांदा भारतीय हवाई दलात सामील करण्यात आले. भारतीय वायुसेनेने याला वज्र असे नाव दिले आहे. 38 वर्षांत आतापर्यंत 13 मिराज-2000 क्रॅश झाले आहेत. भारताने 1982 मध्ये फ्रान्सकडून 36 सिंगल सीटर आणि 4 ट्विन सीटर मिराज 2000 च्या खरेदीसाठी ऑर्डर दिली होती. अमेरिकेकडून पाकिस्तानला F-16 लढाऊ विमाने दिल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला. भारताने 2004 मध्ये आणखी 10 मिराजसाठी ऑर्डर दिली, ज्यामुळे भारतीय हवाई दलातील मिराजची संख्या 50 झाली.1999 मध्ये कारगिल युद्धात मिराजने महत्त्वाची भूमिका बजावून पाकिस्तानी लष्कराचे अनेक बंकर उद्ध्वस्त केले होते. 2020 मध्ये भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांना लक्ष्य करून केलेल्या हवाई हल्ल्यात मिराज-2000 चा वापर करण्यात आला होता.

(हेही वाचा तब्बल ५३ टक्के लोक म्हणतात, देशात ‘लव्ह जिहाद’ सुरु आहे!)

काय वैशिष्ट्ये आहेत सुखोई-३०ची?

सुखोई-३० हे भारतातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्यासाठी हे विमान पहिल्यांदा नोव्हेंबर 1996 मध्ये खरेदी करण्यात आले होते. या विमानात ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे. हे 4.5 व्या पिढीचे फायटर जेट आहे. या विमानाचा वेग ताशी 2,120 किलोमीटर आहे. या विमानाची रेंज 3,000 किमी पर्यंत आहे. एवढेच नाही तर ते हवेतच इंधन भरू शकते, त्यानंतर ते 8,000 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.

(हेही वाचा मविआने मालाडच्या उद्यानाला दिलेले टिपू सुलतानाचे नाव काढण्याचे आदेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.