मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड Tahawwur Rana ला फाशी होणार ? प्रत्यार्पणासंबंधी अटींमध्ये नेमकं काय ?

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड Tahawwur Rana ला फाशी होणार ? प्रत्यार्पणासंबंधी अटींमध्ये नेमकं काय ?

101
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड Tahawwur Rana ला फाशी होणार ? प्रत्यार्पणासंबंधी अटींमध्ये नेमकं काय ?
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड Tahawwur Rana ला फाशी होणार ? प्रत्यार्पणासंबंधी अटींमध्ये नेमकं काय ?

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. विमानतळावर आल्यानंतर राणाला अडीच तासानंतर कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू झाली. यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली. राणाच्या कोठडीची कारणंही वकिलाने कोर्टासमोर मांडली. तसेच राणा (Tahawwur Rana) हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला. कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसाची कोठडी दिली आहे. (Tahawwur Rana)

हेही वाचा-Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी, शनिवारी मेगाब्लॉक; ३३४ लोकल सेवा रद्द, ‘हे’ आहे कारण

मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रानुसार, राणाच्या प्रत्यार्पणासंबंधी अटींत फाशी देऊ नये, असे नमूद नाही. पोर्तुगालहून १९९३ मध्ये बाॅम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला प्रत्यार्पित करण्यात आले होते. तेव्हा त्या देशाच्या अटी होत्या. त्यानुसार भारतातील कोणतेही न्यायालय अबू सालेमला फाशीची शिक्षा देऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर २५ वर्षांहून जास्त शिक्षाही देणार नाही. त्यामुळेच त्यास जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. (Tahawwur Rana)

हेही वाचा- PM Poshan Yojana अंतर्गत साहित्याच्या किंमतीत 9.50 टक्के वाढ

तेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणाले, २५ वर्षे पूर्ण झाल्यावर त्याची सुटका केली जावी. २०३० मध्ये त्याची शिक्षा पूर्ण होईल. हे लक्षात घेऊन भारताने अमेरिकेला अशा अटी ठेवू नयेत, अशी विनंती केली होती. अमेरिकन न्यायालयाने हेडलीला २०१३ मध्ये ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली म्हणजे २०२४८ पर्यंत तो तुरुंगात राहील. हेडलीने लष्कर व आयएसआयविषयीची माहिती अमेरिकेला दिली होती. परंतु त्यासाठी भारताला प्रत्यर्पित केले जाऊ नये, अशी त्याची अट होती. त्यामुळे भारताकडून वारंवार मागणी केल्यानंतरही हेडलीला सोपवले गेले नाही. (Tahawwur Rana)

हेही वाचा- पंढरपुरात वारीदरम्यान होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आता AI technology ची मदत

२६ नोव्हेंबर २००८ रोजी कसाब खुलेआम गोळीबार करत असताना तेव्हा ९ वर्षे ११ महिने वय असलेल्या देविका रोटवानने पाहिला होता. तिने कोर्टात कसाबला ओळखले होते. तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या घटनेबद्दल ती म्हणाली की, सरकारने राणाकडून त्या क्रूर कटाचा सर्व तपशील वदवून घ्या आणि त्याला फाशी द्यावी. त्या हल्ल्यात मला गोळी लागली होती. कसाबला गोळीबार करताना मी माझ्या डोळ्याने पाहिले होते. माझ्यासमोर कित्येक मृतदेह पडले होते. तेव्हा मला भिती वाटली होती. (Tahawwur Rana)

हेही पहा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.