रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या घनघोर युद्ध सुरु आहे. हे युद्ध असेच सुरु राहिले तर युरोपवर त्याचे परिणाम होतील. त्यामुळे कालपर्यंत हे युद्ध लांबणार असे जगाला सांगणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चक्क रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मात्र त्यांनी युक्रेनविषयी चिंताजनक वक्तव्य केले.
युक्रेनसाठी अजून भयानक दिवस
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत फोनवरुन ९० मिनिटे संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पुतिन यांना संपूर्ण युक्रेन ताब्यात घ्यायचा आहे, असे मॅक्रॉन यांनी सांगितल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने दिली. युक्रेनसाठी अजून भयानक दिवस पहावे लागणार आहे, या देशासाठी अधिक वाईट काळ येणार आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आम्हाला जे सांगितले त्यात दिलासादायक असे काहीच नव्हते. ही मोहीम पुढे सुरु ठेवण्यासंदर्भात ते फारच खंबीर असल्याचे दिसते, असे फ्रान्समधील एका वरिष्ठ नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं एएफपीच्या वृत्तात म्हटले. मॅक्रॉन यांनी पुतिन यांना नागरिकांचे मृत्यू होणार नाही आणि मदतकार्य पोहचवता येईल यासंदर्भातील काळजी घेण्याची विनंती केली. त्यावरही पुतिन यांनी आपण असा शब्द देऊ शकत नाही, असे म्हटले.
(हेही वाचा Russia-Ukraine War: संपूर्ण युरोप आले धोक्यात! कारण…)
Join Our WhatsApp Community