बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा (Actor Randeep Hooda) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर सावरकर यांच्या संदर्भातील विविध आठवणी सोशल मिडिया ‘x’वर शेअर करत असतो. २२ मार्चला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने अंदमान-निकोबार येथील सेल्युलर तुरुंग आणि काळे पाणी परिसराला भेट दिली होती. तिथे गेल्यावर त्याने वीर सावरकर यांना मानवंदना देऊन छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे त्याने वीर सावरकर यांच्या ५८व्या आत्मार्पण दिनानिमित्त सोशल मडिया ‘इन्स्टा’वर शेअर करून पोस्ट लिहिली आहे. वीर सावरकर यांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्या सेलमध्ये जाऊन रणदीप वीर सावरकरांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे.
(हेही पहा – Marathi Rajbhasha Din निमित्त मनसेचा उपक्रम; पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी पुस्तकांचा अमूल्य ठेवा )
जेलमध्ये मी २० मिनिटंदेखील राहू शकलो नाही…
आपल्या या पोस्टमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा लिहितो, “भारतमातेचा सर्वात महान पुत्र, नेता, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, कवि, तत्वज्ञ अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. त्यांच्या बुद्धीचं प्रखर तेज व साहसाला घाबरून ब्रिटिशांनी त्यांना ७ बाय ११ च्या छोट्याश्या जेलमध्ये दोन काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी डांबलं. त्यांच्यावरील बायोपीक करताना रेकीदरम्यान मी स्वतःला अंदमानच्या या कोठडीत बंद करून घेऊन बघितलं. जिथे सावरकरांनी ११ वर्षे शिक्षा भोगली त्या जेलमध्ये मी २० मिनिटंदेखील राहू शकलो नाही. त्यांची जिद्द, चिकाटी आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे, म्हणूनच आज कित्येक भारत विरोधी मंडळी त्यांची बदनामी करू पहात आहेत. त्याना शतशः नमन!”
हेही पहा –