Alia Bhatt Daughter: ‘तिने इतर कोणत्याही गोष्टींचं दडपण घेऊन कधीही…’, ‘राहा’विषयी मांडली आलियाने भूमिका

आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'आई' म्हणून ती आपली भूमिका कशी निभावते याबद्दल वक्तव्य केले आहे.

339
Alia Bhatt Daughter: 'तिने इतर कोणत्याही गोष्टींचं दडपण घेऊन कधीही...', 'राहा'विषयी मांडली आलियाने भूमिका

अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर (Alia Bhatt Daughter) यांची लेक राहा कपूर. बॉलिवूडमधल्या दोन बड्या कुंटुंबांची नात आणि सुपरस्टार आई-वडिलांची लेक असणाऱ्या राहाची चर्चा सोशल मीडियावर बरीच होत असते.

आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘आई’ म्हणून ती आपली भूमिका कशी निभावते याबद्दल वक्तव्य केले आहे. आलिया आपल्या मुलीविषयी म्हणते की, ‘राहाने असंच असावं, तसंच असावं, अशी माझी कोणतीही अपेक्षा नाही. मला असं वाटतं की, तिने इतर कोणत्याही गोष्टींचं दडपण घेऊन कधीही अशी व्यक्ती बनू नये, ज्यामुळे ती स्वत:च कधी आनंदी नसेल.’

(हेही वाचा – Muslim : धर्मांध अदनानकडून हिंदू विद्यार्थिनीचा छळ; कुटूंबाला लोखंडी रॉडने मारहाण; कुटुंबिय घर सोडून गेले )

पुढे आलिया सांगते की, ‘कोणाची मुलगी, कोणाची नात होण्यापेक्षा तिने तिचंच स्वत:चं बेस्ट व्हर्जन व्हावं, ज्यात तिचा खरा आनंद आहे.’ आलिया म्हणते की, माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की, प्रत्येक मूल त्याची स्वत:ची कौशल्ये घेऊन जन्माला येतं. आपल्याला एक पालक म्हणून मुलांच्या गुणांना विकसित करण्यासाठी वाव द्यायचा असतो. प्रोत्साहन द्यायचं असतं. त्यामुळे मुलांना त्यांच्या वाटा त्यांच्या मनाने निवडू द्याव्या. राहाच्या बाबतीतही माझा हाच विचार नेहमी असेल, असं आलिया सांगते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.