अनिता देसाई (Anita Desai) या एक भारतीय कादंबरीकार आहेत. याव्यतिरिक्त त्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ह्युमनिटीज या विषयाच्या प्रोफेसर आहेत. लेखिका म्हणून त्यांची ३ वेळा बुकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
अनिता देसाई यांनी त्यांच्या ‘फायर ऑन द माउंटन’ नावाच्या कादंबरीसाठी १९७८ साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांनी १९८३ साली ‘द व्हिलेज बाय द सी’ नावाच्या कथेसाठी ‘ब्रिटीश गार्डियन प्राइज’ अॅवॉर्ड जिंकला होता. ‘द पीकॉक’, ‘व्हॉइसेस इन द सिटी’, ‘फायर ऑन द माउंटन’ या कादंबऱ्या तसेच ‘लघुकथांचे संकलन’, ‘गेम्स ॲट ट्वायलाइट’ ही त्यांची इतर पुस्तके आहेत.
(हेही वाचा – माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार, Eknath Shinde यांची ग्वाही)
अनिता देसाई या ‘ललित कला अकादमीच्या’ सल्लागार मंडळाच्या सदस्य आहेत तसेच त्या लंडन इथल्या ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरच्या’ फेलो मेंबर आहेत.
अनिता देसाई यांच्या जन्म २४ जून १९३७ साली मसुरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव डी.एन. मुजुमदार असं होतं. ते एक व्यापारी होते. त्यांच्या आईचं नाव टोनी निमे असं होतं. त्या जर्मनीच्या निवासी होत्या. लग्नानंतर त्या मसुरी येथे राहायला आल्या होत्या. त्याकाळी युरोपियन स्त्रीसोबत लग्न करणे ही गोष्ट समाजाला मान्य नव्हती. म्हणून अनिता देसाई यांचे आई-वडील दिल्ली येथे राहायला गेले.
तिथे त्या त्यांच्या शेजाऱ्यांसोबत हिंदी भाषा बोलायच्या आणि घरी असल्यावर फक्त जर्मन भाषा बोलायच्या. त्याव्यतिरिक्त त्यांना बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषासुद्धा चांगल्याप्रकारे अवगत होत्या. त्यांनी शाळेत असताना इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. पुढे इंग्रजी हीच त्यांची “साहित्यिक भाषा” बनली.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी इंग्रजी भाषेत लिहायला सुरुवात केली आणि वयाच्या नवव्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. त्या दिल्लीतल्या क्वीन मेरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्टुडंट होत्या. त्यांनी १९५७ साली दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस येथून इंग्रजी साहित्य या विषयात बी.ए. ची पदवी मिळवली.
पुढच्याच वर्षी त्यांनी अश्विन देसाई नावाच्या इसमाशी लग्न केलं. अश्विन देसाई हे एका कम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक आहेत. याव्यतिरिक्त ते ‘बिटवीन इटर्निटीज: आयडियाज ऑन लाईफ अँड द कॉसमॉस’ या पुस्तकाचे लेखकही आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community