Anu Kapoor: बहुरंगी आणि बहुगुणी कलाकार !

अनू कपूर माध्यमिक शाळेत शिकत असताना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. तेव्हा त्यांना आपलं शिक्षण सोडून कामं करणं भाग पडलं.

183
Anu Kapoor: बहुरंगी आणि बहुगुणी कलाकार !
Anu Kapoor: बहुरंगी आणि बहुगुणी कलाकार !

अनू कपूर (Anu Kapoor) हे एक भारतीय अभिनेता, गायक, दिग्दर्शक, रेडिओ जॉकी आणि टेलिव्हिजन अँकर आहेत. आतापर्यंत त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांत आणि टेलिव्हिजन सिरियल्समध्ये काम केलं आहे. एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची जवळजवळ चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत. ही कामं सुरू असतानाच अनू कपूर हे रेडिओ जॉकी म्हणूनही काम करत आहेत.

रेडिओच्या ९२.७ Big FM नावाच्या चॅनलवर अनू कपूर यांचा ‘सुहाना सफ़र विथ अनू कपूर’ नावाचा कार्यक्रम प्रसारित होतो. अनू कपूर यांनी आपल्या आयुष्यात कितीतरी पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यांमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार, एक फिल्म फेअर अवॉर्ड आणि एक इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्डचा समावेश आहे.

अनू कपूर यांचा जन्म २० फेब्रुवारी १९५६ साली भोपाळ येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मदनलाल होतं. त्यांच्या आईचं नावं कमल असं होतं. त्यांचे वडील एक फिरती पारशी ऍक्टिंग कंपनी चालवायचे. ते वेगवेगळ्या गावांत आणि शहरांत जाऊन नाटक करायचे. त्यांच्या आई उर्दू भाषा शिकवायच्या आणि त्या गायिकाही होत्या.

(हेही वाचा – NCP Crisis : 7 दिवसांत शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश )

अनू कपूर माध्यमिक शाळेत शिकत असताना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. तेव्हा त्यांना आपलं शिक्षण सोडून कामं करणं भाग पडलं. त्यावेळेस ते आपल्या वडिलांसोबत नाटक कंपनीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, दिल्ली येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

अनू कपूर यांचं खरं नाव अनिल कपूर असं आहे. पण तेजाब चित्रपटात काम करताना त्यांनी आपलं नाव अनू कपूर असं लावलं. अनू कपूर यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांच्या दोन्ही बायकांपासून त्यांना चार मुलं आहेत. त्यांत तीन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्यांची बहीण सीमा कपूर ही अभिनेता ओम पुरी यांची पत्नी आहे. त्यांचे मोठे भाऊ दिग्दर्शक आणि लेखक आहेत. त्यांची बहीण निर्माती आणि अभिनेत्री आहे, तर लहान भाऊ लेखक आणि गीतकार आहे. अनू कपूर यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक वेगवेगळी कामं केली आहेत. आणि आजही करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.