उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी (Eknath Shinde) आक्षेपार्ह गाणं केल्याने शिवसैनिक आक्रमक झालेत. स्टॅडअप कॉमेडियन (Standup comedian) कुणाल कामराने व्यंगात्मक टीका करत शिंदेंवर निशाणा साधला. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी कामराच्या कार्यालयाची तोडफोड केली. अशातच आता गुलाबराव पाटील यांनीही कुणाल कामराला (Kunal Kamra controversy) इशारा दिला आहे. दोन दिवसांत माफी मागितली नाही तर तोंडाला काळं फासू असं गुलाबराव पाटील म्हणाले. (Gulabrao Patil)