झाडे पडण्यामागे वादळे निमित्त, वृक्ष रोपणाची पद्धत चुकीची!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रसिद्ध वृक्षतज्ज्ञ, वृक्ष अभ्यासक वैभव राजे यांनी 'हिंदुस्थान पोस्ट' ला मुलाखत दिली. 

‘ट्री प्लॅन्टेशन’ शब्दात ‘प्लॅन’ हा शब्द आहे. झाड लावताना फक्त खड्डा आणि खत महत्वाचे नसते, तर ते झाड पुढील २०-२२ वर्षांत किती वाढेल, त्याचे चांगले-वाईट काय परिणाम होतील, याचा आधी विचार होणे गरजेचे असते. तो न झाल्याने झाडे पडतात, वादळे त्यासाठी निमित्त ठरतात, असे वक्तव्य वृक्षतज्ज्ञ, वृक्ष अभ्यासक वैभव राजे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ ला मुलाखत देताना केले. ‘हिंदुस्थान पोस्ट’ च्या सल्लागार संपादक मंजिरी मराठे यांनी ही मुलाखत घेतली. वैभव राजे हे देशातील पहिले आरबोरिस्ट म्हणून ओळखले जात असून युरोपमधून आरबोरिस्टचे शिक्षण पूर्ण करून आज ते मुंबई, महाराष्ट्राबरोबर देशातील अन्य राज्यांतील झाडांचे आरोग्य जपण्याचे कार्य करत आहेत.

(हेही वाचा : वनात राहू शकत नाही, तर परिसर वन्य सदृश्य करूया! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here