बाबुलनाथ मंदिर (Babulnath Mandir) हे मुंबईतील एक प्राचीन शिवमंदिर आहे. गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले, हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. बाबुल वृक्षाच्या रूपातील शिव ही या मंदिरातील मुख्य देवता आहे. भाविक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि शिवाचा आशीर्वाद घेतात. बाबुलनाथ मंदिर ही चुनखडी आणि संगमरवरी बनलेली एक सुंदर, गुंतागुंतीची कोरीव इमारत आहे, जी एका छोट्या टेकडीवर वसलेली आहे. सध्याचे मंदिर १८९० साली बांधलेले आहे. लोकं येथे जास्त काळ थांबून पूजा करतात. पूर्वीचे मंदिर १८व्या शतकात बांधले गेले होते. बाबुलनाथ मंदिराबाबत काही मनोरंजक गोष्टी –
१. सुमारे ३०० वर्षांपूर्वी (१७००-८० च्या दरम्यान) मलबार टेकडीजवळील बहुतांश जमीन सुवर्णकार पांडुरंग याच्या मालकीची होती. असे म्हटले जाते की, या सोनाराकडेही अनेक गायी होत्या. गायींच्या देखभालीसाठी पांडुरंगाने एक मेंढपाळ ठेवला होता. ज्याचे नाव बाबुल होते. सर्व गायींपैकी कपिला नावाची गाय सर्वाधिक दूध देत असे. जेव्हा सुवर्णकाराने बाबुलला यामागचे कारण विचारले, तेव्हा त्याने त्याला सांगितले की, कपिला गवत चरून झाल्यावर एका विशिष्ट ठिकाणी जाते आणि तिथे दूध देते. या दिवशी सोनाराने आपल्या लोकांना जिथे कपिला गाय दूध देत असे, ती जागा खोदण्याचे आदेश दिले. त्यानंतर तेथून एक काळ्या रंगाचे स्वयंभू शिवलिंग उदयास आले. या मंदिराला ‘बाबुलनाथ मंदिर’ म्हटले जाऊ लागले. आजही हेच नाव प्रचलित आहे.
२. हे मंदिर पाहण्यासाठी अनेक भाविक येतात. येथील खांब आणि भिंतींवर सुंदर कोरीव काम करण्यात आले आहे, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मंदिरात स्थापित केलेल्या मूर्ती पाहून त्या काळातील कलाकारांच्या अद्भुत चित्रकलेचा अनुभव येतो. मंदिराच्या भिंतींवर उत्कृष्ट चित्रे काढली गेली आहेत.
३. बाबुलनाथ मंदिराच्या परिसरात हँगिंग गार्डन, बाणगंगा, वालुकेश्वर मंदिर, चौपाटी, कमला नेहरु पार्क अशी फिरण्याची अनेक ठिकाणे आहेत.
४. दर सोमवारी बाबुलनाथ मंदिरात विशेष पूजेचे प्रयोजन असते. दर्शनाकरिता भक्तांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसतात.
५. ‘बाबुलनाथ मंदिर’ हे मंदिराच्या या वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे विशेष चर्चेत राहिले आहे. मंदिराचे नाव बाबुलनाथ असे ठेवण्यामागे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कथा सांगितल्या जातात. याविषयी मंदिराचे पुजारी आणि स्थानिक नागरिकही माहिती देतात. काही पौराणिक कथाही याविषयी सांगितल्या जातात.
६. दरवर्षी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठा उत्सव असतो. त्यावेळी लाखो भाविक मंदिराला भेट देतात.
७. या मंदिरात एक शिवलिंग आणि ४ मूर्ती आहेत. ज्या १८व्या शतकात सापडल्या होत्या. पहिल्यांदा १२व्या शतकात हिंदू राज भीमदेवने या मूर्तींची शुद्धी केली. त्यातील एका मूर्ती भंजन झाल्यामुळे तिचे समुद्रात विसर्जन केले. त्यामुळे शिवलिंग आणि गणपती, हनुमान आणि पार्वतीदेवीची मूर्ती सध्या मंदिरात आहे.
८. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी गुडघे आणि खांदे झाकणारे कपडे परिधान करावे लागतात.
९. मंदिरात जाण्यासाठी लिफ्टचा मार्ग असला, तरीही अनेक पायऱ्या चढून जावे लागते.
१०. मलबार हिल परिसरात बाबुलनाथ रोडवरील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलपासून रस्त्याच्या पलीकडे हे मंदिर आहे. चौपाटी बीचपासून मंदिरात जाण्यासाठी १० मिनिटे लागतात, तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन, ग्रँट रोड, १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. फोर्ट परिसरातून टॅक्सीने गेल्यास १० मिनिटे लागतात.
(हेही वाचा – Gorakhpur Railway Station: गोरखपूरला जाताय? ‘या’ ठिकाणांना अवश्य भेट द्या )
कधी जायचे?
बाबुलनाथ मंदिर मंगळवार ते रविवार सकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत आणि सोमवारी सकाळी ४:३० ते रात्री ११:३० पर्यंत खुले असते.
बाबुल वृक्षाचा उपयोग…
बाबुल वृक्षाचे स्वामी शिव आहे. ज्याला अरबी आणि इजिप्शियन बाभूळ वृक्ष देखील म्हणतात. हे झाड दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेमध्ये हजारो वर्षांपासून वापरात आहे. त्याचा रस, ज्याला गम अरेबिक म्हणूनदेखील ओळखले जाते. याचा वापर अन्न उत्पादनापासून ते प्रिंटमेकिंगपर्यंत विविध प्रकारच्या कामासाठी केला जातो.
हेही पहा –