वन्यजीवनाच्या पलीकडचे बांधवगड राष्ट्रीय उद्यान!

बांधवगड किल्ला गोंड साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी बांधला होता. पांड्रो जातीचे गोंड राजे या किल्ल्याचे मूळ रचनाकार असून गोंड राजांचे वंशज अजूनही या किल्ल्याजवळच राहतात.

127

मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे. जबलपूरच्या ईशान्य दिशेला १९७ किमी अंतरावर हे राष्ट्रीय उद्यान आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य भारतातील विंध्य पर्वतरांगाशी संबंधित आहे आणि देशात वाघांच्या संख्येचे प्रमाण देखील उत्तम आहे. राष्ट्रीय उद्यान म्हटले की आपल्याला वन्यजीवन आठवते, परंतु बांधवगढ उद्यान हे वन्यजीवांच्या पलीकडे देखील अतिशय सुंदर आहे. त्याचाच हा छोटासा आढावा.

बांधवगड किल्ला

ज्या किल्ल्यापासून उद्यानाला बांधवगड हे नाव दिले गेले, तो बांधवगड किल्ला उद्यानाच्या आतमध्येच आहे. समुद्रसपाटीपासून १,१११ मीटर उंच असलेला हा किल्ला कधी बांधला गेला ह्याची नोंद उपलब्ध नाही. असे मानले जाते की, हा किल्ला सुमारे २,००० वर्ष जुना आहे आणि “नारद-पंच रात्र” आणि “शिव पुराण” या प्राचीन पुस्तकांमध्ये त्याचे संदर्भ आहेत. प्रादेशिक लोककथा सूचित करतात की, बांधवगड किल्ला गोंड साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी बांधला होता. पांड्रो जातीचे गोंड राजे या किल्ल्याचे मूळ रचनाकार असून गोंड राजांचे वंशज अजूनही या किल्ल्याजवळच राहतात. गोंड राजांनी 12 तलाव बांधले, त्यातील मोजकेच शिल्लक आहेत. या किल्ल्याचे बांधकाम आणि वास्तुकला गोंड राजांनी बांधलेल्या इतर किल्ल्यांसारखेच आहे.

(हेही वाचा : जेरुसलेम : जगाच्या इतिहासातील सोनेरी पान!)

ह्या किल्ल्याबद्दल अजून जाणून घ्यायचे झाले, तर हा किल्ला कौशांबी आणि भरहूत ह्या दोन ठिकाणा दरम्यानच्या व्यापार्‍यांचे व्यवसाय केंद्र होते. त्या काळी बर्दावती (भाऊ मुळ) म्हणून ओळखले जात असे. कलाचुरी घराण्याच्या काळात त्याला “हैय क्षेत्र” असे संबोधले जात असे. वाकाटक राजवंशाने या जागेचा खूप उपयोग केला. त्या काळाची अनेक शिल्पे आणि नाणी सापडली आहेत, जी राज्याची आर्थिक आणि कलात्मक परिस्थिती दर्शवितात. करण देव (विक्रम संवत १२४५ – १२६०) च्या कारकीर्दीत, बांधवगड ही गहोरा राज्याच्या दक्षिण भागाची राजधानी होती.

शेष शय्या

शेष शय्या हे “शिवलिंग” आणि “भगवान ब्रह्मा” सोबत “शेष नाग” च्या छत्री असलेल्या विष्णूची ११ मीटर लांबीची अद्भुत मूर्ती आहे. ते पदपथच्या मुख्य प्रवेशद्वारावर, बांधवगड किल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावरच आहे. “गंगा” नदीचे उगम “भगवान विष्णू” च्या पायथ्यापासून वाहते आणि म्हणूनच हे नाव घेण्यात आले. हा पुतळा १० व्या शतकात बांधला गेला असावा, असे म्हटले जाते.

New Project 9 2

(हेही वाचा : अंगकोर वॅट : प्राचीन वास्तुकलेचा अजरामर ठेवा!)

बडी गुफा

बांधवगड उद्यानात प्राचीन लेण्या बांधल्या गेल्या आहेत. या प्रदेशात जवळपास ३९ गुहा आहेत, त्या सुमारे ५ किमी लांबीच्या आहेत. ब्रह्मी लिपीची शिलालेख असलेलया अनेक लेण्या येथे आढळतात आणि त्यातील काही लेण्यांमध्ये वाघ, डुक्कर, हत्ती आणि घोडेस्वार यांचीही नक्षीदार प्रतिमा आहेत. बडी गुफाचा शाब्दिक अर्थ म्हणजे ‘सर्वात मोठी गुहा’. ही सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहे आणि १० व्या शतकातील आहे. या गुहेत असंख्य खांब व नऊ मोठ्या खोल्या आहेत. या लेणी आदिम स्वरूपात आहेत आणि त्यामध्ये विस्तृत पुतळे आणि कोरीव कामांचा अभाव आहे. कोणालाही या लेण्यांचा हेतू नक्की काय होता ते अजूनही एक रहस्य आहे. त्यातील एक सिद्धांत असा आहे की याचा उपयोग साधूंनी आध्यात्मिक साधनांसाठी आणि नंतर सैन्याने मोक्याच्या उद्देशाने केला असावा. या लेण्यांमध्ये उद्यानातील वाघ, वटवाघूळ आणि इतर विविध वन्यजीवनांचा आश्रय आहे.

beautiful

(हेही वाचा :बिबट्याचे संवर्धन ही काळाची गरज!)

पांढरा वाघ

बांधवगढमध्ये अनेक वर्षांपूर्वी पांढरे वाघ देखील होते, परंतु १९५० पासून पांढरा वाघ दिसण्याची नोंद नाही. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ साली अंमलात आला आणि व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. या योजने अंतर्गत बांधवगढ उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. येथील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे आणि त्याचबरोबर या राष्ट्रीय उद्यानाचे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व परदेशी पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.

New Project 10 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.