शिक्षण, रोजगार, उत्तम सोयीसुविधा…अशा सर्वच बाबतीत मुंबईनंतर पुणे शहराचं नाव आवर्जून घेतलं जातं. मुंबईप्रमाणेच देश-विदेशातील नागरिक पुण्याला भेट देतात. शिक्षण आणि कलांचं ‘माहेरघर’ समजल्या जाणाऱ्या पुण्यात तुम्ही गेलात आणि तेथे राहण्याकरिता आणि भोजनाकरिता कोणत्या हॉटेल्समध्ये जावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही; पुण्यात हॉटेल इंडस्ट्रीही झपाट्याने विकसित झाली आहे. पुण्यात विविध ठिकाणी दर्जेदार सोय असलेली अनेक लोकप्रिय हॉटेल्स आहेत. (Best Hotels In Pune)
आशियातील सर्वाधिक पब असलेलं शहर म्हणून पुण्याचा क्रमांक लागत असला, तरीही येथे राहण्या-खाण्याकरिता उत्तमोत्तम हॉटेल्स आहेत. ऑफिस, घरगुती, समारंभ, वाढदिवस किंवा प्रिय व्यक्तिसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी तुम्ही हमाखास या हॉटेल्सना भेट देऊ शकता.
जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल (JW Marriott Hotel)
पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट हे ५ स्टार हॉटेल आहे. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथे हे हॉटेल आहे. सर्व सुविधांनी युक्त बड्या लोकांची पसंती या हॉटेलला मिळालेली आहे. स्विमिंग पूल, पब, सलून, विविध खेळ या हॉटेलमध्ये खेळता येऊ शकतं. येथे एका दिवसाचा राहण्याचा खर्च दिवसाला १५ ते १८ रुपये इतका आहे. हेल्दी ब्रेकफास्ट, मसालेदार, चमचमीत जेवण, पुणे एअरपोर्टपासून जवळ, कमीतकमी ३ रात्र या हॉटेलमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. याशिवाय लॉंण्ड्रीव्यवस्थाही येथे आहे.
कॉनराड हॉटेल (Conrad Pune)
पुण्यातील टॉप ५ हॉटेल्सच्या यादीत दुसरा क्रमांक ‘हॉटेल कॉनराड’चा लागतो. संगमवाडी येथे हे हॉटेल असून येथे एक दिवसाच्या मुक्कामाकरिता साधारण खर्च १३ ते १५ हजार रुपये इतका आहे. या हॉटेलला ४.६ स्टार मिळालेले आहेत.
हयात हॉटेल (Hyatt hotel pune)
हे हॉटेल पुण्यातील प्रसिद्ध अग खान पॅलेसजवळ कल्याणी नगर येथे आहे. चांगल्या हॉटेल्सच्या यादीत हॉटेल हयातचे नावदेखील येते. या हॉटेलमध्ये राहण्यासाठीचा एका दिवसाचा खर्च ६,९४४ रुपये इतका आहे.
द रिट्झ कार्लटन हॉटेल (The Ritz-Carlton, Pune)
पुण्यातील टॉप ५ हॉटेल्सच्या यादीतलं चौथं नाव हे हॉटेल जयप्रकाश नगर, येरवडा, पुणे येथे आहे. या हॉटेलला ४.७ स्टार असून या हॉटेलमध्येदेखील शानदार स्विमिंग पूल, स्पा, बार यांची सोय आहे. या हॉटेलचे दिवसाचे भाडे साधारण १६ हजार रुपयांपर्यंत आहे.
द वेस्टीन हॉटेल (The Westin Pune Koregaon Park)
हे हॉटेल पुण्यातील मुळा मुठा नदीच्या तिरावर असून या हॉटेलची इमारत अतिशय आकर्षक आहे. हे हॉटेल पुणे विमानतळापासून अवघ्या ८ किमी. अंतरावर कोरगाव पार्क येथे आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीस्कर आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गोल्फ खेळण्याची सोय आहे शिवाय उत्तम खाण्यापिण्याची आणि राहण्याचीही सोय आहे. या हॉटेलमध्ये राहण्याचा एक दिवसाचा साधारण खर्च १२, हजार रुपये आहे.